ग्रामीण भागातील घरकुल योजना चे अनुदान रु 1,20,000 ऐवजी रु.2,50,000 करून लाभार्थी ना मिळणे बाबत मुक्ताईनगर काँग्रेस ची मागणी शासनामार्फ...
ग्रामीण भागातील घरकुल योजना चे अनुदान रु 1,20,000 ऐवजी रु.2,50,000 करून लाभार्थी ना मिळणे बाबत मुक्ताईनगर काँग्रेस ची मागणी
शासनामार्फत घरकुल साठी 10,12 वर्षापासुन रु 1,20,000 एवढे अनुदान देण्यात येते परंतु सिमेंट,आसारी,रेती, खडी यांचे भाव गगनाला भिडले आहेत .
किरण पाटील अंतुर्ली
संपादक : हेमकांत गायकवाड
शासनामार्फत भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी ,SC ,ST ,OBC ,अल्पसंख्यांक व ईतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ शासनाच्या विविध योजनेतून मिळत आहे व शासनामार्फत घरकुल साठी 10,12 वर्षापासुन रु 1,20,000 एवढे अनुदान देण्यात येते परंतु सिमेंट,आसारी,रेती, खडी यांचे भाव गगनाला भिडले आहेत . जागा जर 350/400 स्क्वे.फुट असल्यास मजुरी रु.200/-प्रती स्क्वे.फु. प्रमाणे साधारण रु.70,000 ते रु.80,000 व ईतर साहित्य या मूळे बांधकाम एवढ्या रकमेत होऊ शकत नाही.तरी ग्रामीण भागात घरकुलास प्रत्येक लाभार्थ्यास रु. 2,50,000 अनुदान मिळावे/ मंजुर करावे
शासनाकडून घरकुल लाभ दिला जातो म्हणजे शासन स्वतः मालक बनत आहे तसेच लाभार्थींना भूमिहीन करत आहात तशी नोंद ग्रामीण भागात नंबर 8 ला ग्रामपंचायत स्तरावर घेत आहे हे चुकीचे आहे घरकुल लाभ मिळाल्यास नंबर आठ ला शेरा सदरील लाभाची नोंद घेण्यात यावी ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टर ला शेरा सदरील घरकुलाची नोंद करा अशी विनंती मुक्ताईनगर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी अँड.अरविंद गोसावी(प्रदेश प्रवक्ते), डॉ जगदीश पाटील( सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) ,शेख भैय्या शेख करीम (अध्यक्ष अंतुर्ली शहर काँग्रेस),
अनिल सेनु वाडीले (प्रदेश सचिव),प्रा.सुभाष पाटील (अध्यक्ष तालुका सेवादल काँग्रेस)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग मुंबई ,राज जाधव,बिडी गवई,निखील चौधरी,भाऊराव बोदडे,राजेंन्द्र ,मान्यवर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments