कर्जाणे गावातील सबस्टेशन चालू करा असे कर्जाने ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ यांची मागणी अन्यथा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणा...
कर्जाणे गावातील सबस्टेशन चालू करा असे कर्जाने ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ यांची मागणी
अन्यथा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन करतील
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील मौजे कर्जाणे येथील आदिवासी बाहुल क्षेत्रात असलेले कर्जाणे येथे वीज महावितरणाचे 33 KV असेलेले सब स्टेशन बांधकाम गेल्या दहा वर्षापासून बांधून असून ते अद्याप प्रलंबित आहे.तसेच आदिवासी भागातील वैजापूर पासून ते देवगड या शेतकरींना हंगामी पिकासाठी विजेची लोड सेटिंग चा विजेचा भार खूप मोठा प्रमाणावर निर्माण होत आहे.तरी येणारा रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणा वर परिणाम होत आहे.तसेच आदिवासी शेतकऱ्यांना शासनाचा कुठल्याही पिक विमा नुकसान मिळत नाही व तसेच घरगुती विजसाठी देखील मीटर वर बिल मोठ्या प्रमाणावर येत आहे,असे अनेक विज महावितरण संबंधी समस्या या आदिवासी बांधवांना सामोरे जावं लागत आहे.अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी,विभाग धरणगाव याचे कडे निवेदनाद्वारे मागणी केलीले आहे.तरी आदिवासी शेतकरी भोला भाला समाज कोणाच्यातरी गाफिला न राहता यांची समस्या प्रशासनाला विनंती आहे.तरी संबंधित विभागाचे मंत्री याचेकडे समस्या बाबत तात्काळ त्यांच्या निर्देशनास आणुन द्यावा,गरीब आदिवासी शेतकरी बांधव स्वतःची जमीन कसंत जीवन निवारा करत विकासाच्या मार्गावर चालावा व तसेच यांच्यावर अन्याय न होता सबस्टेशन त्वरित चालू करण्यात यावा
अन्यथा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन करेल.
अशा आशयाचे निवेदन कर्जाने ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोद बारेला व कालूसिंग थांबा यांनी दिले.
No comments