अंतुर्ली येथे श्री सिताराम मुंजोबा महाराजांची यात्रा संपन्न मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील श्री सिताराम मुंजोबा महाराजांची यात्रा ...
अंतुर्ली येथे श्री सिताराम मुंजोबा महाराजांची यात्रा संपन्न
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील श्री सिताराम मुंजोबा महाराजांची यात्रा माघ पोर्णिमा या तिथीवर दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी संपन्न झाली .
प्रतिनिधी:किरण पाटील मुक्ताईनगर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :-
तालुक्यातील अंतुर्ली येथील श्री सिताराम मुंजोबा महाराजांची यात्रा माघ पोर्णिमा या तिथीवर दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी संपन्न झाली . या श्री सिताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रेला आज रोजी 64 वर्ष पूर्ण झाले . या श्री सिताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रेची सुरुवात सन 1960 रोजी झाली . श्री सिताराम मुंजोबा महाराज यांची पूजा सकाळी अंतुर्ली येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश तराळ , अंतुर्ली गावचे पोलीस पाटील किशोर मेढे व मा .सो .पोलीस हवालदार यांच्या हस्ते करण्यात आली . या यात्रेच्या निमित्ताने दूरदुरून भाविक भक्त नवस मानण्यासाठी येतात व नवस पूर्ण झाल्यावर नवस फेडायला येतात . या श्री सिताराम मुंजोबा महाराजांचे देवस्थान नरवेल रोडवरील श्री ओम शिव मंदिरापाशी सोनवणे कुटुंबाच्या वाड्यात आहे . यात्रेच्या दिवशी भाविकांसाठी मंदिरात सोनवणे कुटुंबांकडून वरण बट्टीचे जेवण बनविले जाते
या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने आले होते . जसे लहान मुलांसाठी खेळण्याचे दुकाने , मंदिराजवळ नारळ , फुल , प्रसादाचे व पूजेचे दुकाने , संसारोपयोगी वस्तूचे दुकाने , खाद्यपदार्थाचे दुकाने , तसेच रेवड्या , मुरमुरे ,खारे शेंगदाणे यांचे सुद्धा दुकाने लागले होते . या यात्रेत वेगवेगळ्या भागातून भाविक भक्त येतात जसे मध्य प्रदेश, विदर्भ ,मराठवाडा व खानदेशातील भाविक भक्त आले होते . या यात्रेच्या निमित्ताने गावातून काठीमाईची मिरवणूक काढण्यात आली होती . प्रथम काठीमाईला नदीवर नेऊन आंघोळ केली व नंतर कपडे लपटून पूजा करून गावात फिरवली जाते .यावेळी काठीमाईच्या मागे भाविक भक्त उपस्थित होते . या यात्रेत पोलिसांकडून चोख बंदोबस्त होता . या यात्रेच्या निमित्ताने मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील , राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांनी भेट दिली . या यात्रेत शेकडो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते . या यात्रेत लहान मुलांसाठी आकाशी पाळणे ,वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आले होते . यावेळी भाविक भक्तांनी यात्रेचा आनंद घेतला .
*किरण पाटील मुक्ताईनगर*
No comments