adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मालेगाव पोलिस स्टेशनचे संबधित अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत. .....जगदिश मानवतकर

  मालेगाव पोलिस स्टेशनचे संबधित अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत. .....जगदिश मानवतकर स्थानिक वाशीम येथील रहिवाशी असलेले ऑल इंडिया ब्ल्यु टा...

 मालेगाव पोलिस स्टेशनचे संबधित अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत. .....जगदिश मानवतकर

स्थानिक वाशीम येथील रहिवाशी असलेले ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर 




संपादक : हेमकांत गायकवाड 

स्थानिक वाशीम येथील रहिवाशी असलेले ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर यांच्या वडिलांचा अपघात दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी व्यंकटेश पेट्रोल पंप समोर , झोडगा फाटा मालेगाव येथे झाला होता .यावेळी मालेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार संजय चौधरी आणि तपास अधिकारी रहाटे यांनी तपास करताना फार उशीर लावला .तसेच ते कोणत्या दिशेने तपास करत आहेत याची माहिती मी फिर्यादी असूनही दिली नाही.मला कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी दिली नाही.अपघात झाल्यापासून मला त्यांनी कोणत्याही प्रकारचा फोन केला नाही ,मालक आणि चालक यांच्या विषयी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही , मोबाईल वर फोन लावला तर संजय चौधरी हे ठाणेदार असून माझा फोन उचलत नाहीत तर तपास अधिकारी रहाटे हे माझा फोन हरवला आहे त्यामुळे मला फोन करू नका असे म्हणतात.त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन लागत नाही.तरी या प्रकरनात मालेगाव पोलिस स्टेशन चे संबधित अधिकारी हे आरोपी वाहन चालक आणि वाहन मालक यांच्या सोबत काही पैश्याची घेवाण देवाण करून म्याणेज झाले आहेत .असा संशय जगदिश मानवतकर यांनी या निवेदनात नमूद केला आहे.मी फिर्यादी असूनही त्यांचा आतापर्यंत घटना झाल्यापासून  मला एकही फोन आला नाही की आमचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे याची कोणतीच माहिती मला व माझ्या कुटुंबांना दिली नाही.तरी या प्रकरणात संजय चौधरी आणि रहाटे हे आरोपींना पाठीशी घालत आहेत असा संशय जगदिश मानवतकर यांनी केला आहे.म्हणून या माझ्या प्रकरणात आपण मदत करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक,पालक मंत्री यांना  जिल्हा पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांच्या मार्फत केली आहे.कोणीही कोणालाही उडवून देणे ,त्यांचा जीव घेणे आणि साधी विचारपूस त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी करू नये असा प्रत्यय या पोलिस अधिकारी यांच्यामुळे झाला आहे असे मत जगदिश मानवतकर यांनी प्रसांर माध्यम यांच्याशी बोलताना केले आहे.लवकरच या प्रकरणात मी पत्रकार बैठक घेऊन या माझ्या वडिलांच्या अपघाताने मृत्यू च्या प्रकरणात मोठा निर्णय घेणार आहे.त्यानंतर तीव्र आंदोलन किंवा ठिय्या आंदोलन केले जाईल.तसेच या अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुंबई येथे जाऊन भेट घेणार आहे असे मत त्यांनी प्रसारमाध्यम यांच्याशी बोलताना केले आहे.माझ्या वडिलांच्या अपघाताने झालेल्या मृत्यूच्या प्रकरनात मला व माझ्या कुटुंबांना न्याय न मिळाल्यास मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी आणि तपास अधिकारी यांना सुद्धा सहआरोपी करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि त्यांच्या विरोधात विद्यमान न्यायालय वाशीम येथे प्रकरण टाकण्यात येईल असे मत स्व. लक्ष्मण लहानुजी मानवतकर यांची चिरंजीव जगदिश मानवतकर यांनी व्यक्त केले आहे.तरी मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस महासंचालक पालक मंत्री यांना निवेदन मार्फत केली आहे.

No comments