राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री कृत्रिम रेतन प्रशिक्षणास स्थगिती द्या पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन महासंघ संघटनेची तुकाराम ...
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री कृत्रिम रेतन प्रशिक्षणास स्थगिती द्या
पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन महासंघ संघटनेची
तुकाराम मुंढे,पशुसंवर्धन सचिव यांना एका पञकान्वे मागणी
चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
राज्यात कृषी विद्यापीठ पशुवैद्यकीय विद्यापीठ द्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असतांना शासन राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री कृत्रिम रेतन प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे.सदर प्रशिक्षण साठी12 वी पास बेरोजगार यांना तयार करण्यात येत आहेत.शासनाकडे पशु पदविकाधारक हे प्रशिक्षित मनुष्यबळ असतांना 12 वी पास असलेल्या बेरोजगारांना गाई म्हशींचा अति संवेदनशील अवयव गर्भाशय हाताळण्यासाठी केवळ 3 महिन्यात प्रशिक्षित करून पशुधन व शेतकऱ्यांस पर्यायी दुगधव्यवसाय धोक्यात येणार आहे.तरी शासनाने प्रशिक्षित पशु पदविकाधारक असतांना त्यांना कृत्रिम रेतन साठी प्राधान्य द्यावे. व गोकुळ अंतर्गत कृत्रिम रेतन प्रशिक्षण ला त्वरीत स्थगिती द्यावी ज्या मुळे शासनाचा पैसा वाचून त्यांना प्रगत असे पशु पदविकाधारक मनुष्यबळ उपलब्ध होईल.तरी सदर बाब ही शासनाच्या लक्ष्यात आणून देऊन या प्रशिक्षण प्रणालीला आमच्या पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन महासंघ संघटनेचा विरोध असुन या कार्यक्रमावर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ स्थगिती द्यावी.अन्यथा राज्य संघटना व जळगाव जिल्हा संघटना तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ.दिपक लोखंडे व राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.दिपक आहेर यांनी दिला.सदर निवेदनची एक एक प्रत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जळगांव जिल्हा डॉ.शामकातं पाटील यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.याप्रसंगी निवेदन देतेवेळी डॉ.रामचंद्र सोनवणे,डॉ.शंकर झोपे,डॉ.संदीप भालेराव,डॉ.योगेश सूर्यवंशी,डॉ.युवराज पाटील,डॉ.जितेंद्र चोपडे,डॉ.रवी कोळी,डॉ.दिपक शेवाळे,डॉ.प्रवीण पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments