पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न प्रमुख अतिथी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व तसे...
पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
प्रमुख अतिथी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडा चे माजी अध्यक्ष रोटे.विलास पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते,
चोपडा प्रतिनिधी
( संपादक: हेमकांत गायकवाड)
पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ह्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडा चे माजी अध्यक्ष रोटे.विलास पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते,तर दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शारदा क्लासेस चे संचालक गौरव महाले व तसेच ओम शांती सेंटर च्या मंगला दिदी उपस्थित होत्या.ह्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात,कला क्षेत्रात,शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये,तसेच तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगीरी करुन सुवर्ण,रौप्य आणि कास्य पदकांसह प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक करुन प्रोत्साहन वाढविले.ह्या सोहळ्याप्रंसंगी पालक प्रतिनिधी म्हणुन जी.डी.पाटील,रविराज पाटील,गिरीश देशमुख,किशोर महाजन,छगन पाटील,किरण बडगुजर,निलेश पाटील हे मंचावर उपस्थित होते.आपल्या पाल्यांची प्रगती आणि त्यांचे यश पाहुन पालक देखील आनंदी झाले.पालक देखील विद्यार्थांचे कौतुक करण्यासाठी व पारितोषिक स्विकारन्यासाठी मंचावर उपस्थित होते.ह्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे,पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे,पंकज इंग्लिश मेडीयम स्कृल चे प्राचार्य केतन माळी यांची देखील उपस्थिती लाभली.सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी साबळे,स्वाती शिंदे,स्वाती पाटील,प्रीती पाटील,नितीन वाल्हे यांनी केले.
ह्या प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ सुरेश बोरोले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments