adds

Page Nav

HIDE
Sunday, July 20

Pages

Subscribe Us

Advertisment

*१०२ कोटींच्या कामांचे उद्घाटन एकाच दिवसात होणे ही काही थट्टा, मस्करी नाही. कणखर व जनहित आमदार लाभणे चोपडा मतदार संघाचे भाग्य .. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील*

  *१०२ कोटींच्या कामांचे उद्घाटन एकाच दिवसात होणे ही काही थट्टा, मस्करी नाही. कणखर व जनहित आमदार लाभणे चोपडा मतदार संघाचे भाग्य .. पालकमंत्र...

 *१०२ कोटींच्या कामांचे उद्घाटन एकाच दिवसात होणे ही काही थट्टा, मस्करी नाही. कणखर व जनहित आमदार लाभणे चोपडा मतदार संघाचे भाग्य .. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील* 

♦️आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून करोडोंच्या कामांचे उद्घाटन व लोकार्पण दिमाखात संपन्न 




 *चोपडा दि.२६(प्रतिनिधी महेश शिरसाठ):*

(संपादक : हेमकांत गायकवाड) 

चोपडा मतदार संघात १०२ कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन एकाच दिवसात होणे ही काही थट्टा मस्करी नाही. भर उन्हाळ्यात प्रति दिवशी पायाला भिंगरी बांधून पायपीट करणारे आमदार चोपड्याच्या नशीबी आले आहेत. कोणताही भेद मनी न ठेवता जनसेवेचा चंग मनाशी ठेवून अद्वितीय असे काम करण्याची जिद्द मनाशी बाळगणारे जिद्दी जिगरबाज आमदार चोपडा मतदार संघाला लाभणे एक जनतेचे भाग्यच आहे असे परखड प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी येथे केले.



ते चोपडा येथे आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चौपडा विधानसभा) व मा.आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचे उद्घाटन लोकार्पण प्रंसगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील, कार्यसम्राट आमदार सौ.लताताई सोनवणे,तालुक्याचे सुपरस्टार माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, जेडीसीसी बँक संचालक घनश्याम अग्रवाल, दूध उत्पादक संघ संचालक रोहित निकम, आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, चोपडा प्रांताधिकारी एकनाथराव बंगाडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी हेमंत निकम, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,यावल कॢषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बबलु कोळी,संचालक रावसाहेब पाटील, सुर्यभान पाटील सर ,गोपाल पाटील, शिवराज पाटील,विजय पाटील, किरण देवराज, सौ कल्पना पाटील, सौ मंगला ताई पाटील,सुभाष अप्पा सोळुंके,एम. व्ही पाटील, विकास पाटील, प्रकाश राजपूत, राजेंद्र पाटील,प्रताप पावरा, राजेंद्र पाटील, न.पा बांधकाम अभियंता सचिन गवांदे, इलेक्ट्रिक मान्यवर उपस्थित होते 



यावेळी चोपडा शहर भुयारी गटार योजना ८५ कोटी ,चोपडा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. १ ते १४ मध्ये सोलर हायमास्ट लाईट बसविणे 

चोपडा शहरातील हद्दीतील महात्मा गांधी उद्यान सुशोभिकरण ,

नवीन प्रशासकीय इमारत लोकार्पण , चोपडा नगरपरिषदेतील प्रभाग क्र. १४ मधील गट नं. ९२२ वरील खुल्या जागेवर कोळी समाज सामाजिक सभागृह बांधकाम करणे करणे ,चोपडा येथे वनविभाग विश्रामगृह दुरुस्ती करणे ,



चोपडा नगरपरिषद हद्दीतील महावीर नगर परिसरातील मंदीराजवळ नगर पालिकेच्या ओपन स्पेस जागेवर वाॅल कंपाऊंड बांधणे ,

चोपडा शहरातील गट नं. १६२२ सि.स.नं. ५९९० वरील खुल्या जागेवर कंपाऊंड बांधणे, जॉगींग ट्रॅक करणे तसेच सुशोभिकरण करणे , 

चोपडा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. १४ मधील गट नं. ९३९(१/२) वरील खुल्या जागेवर मराठा समाज सामाजिक सभागृह बांधकाम करणे अशा विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी नागरीकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते प्रचंड संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकलूदच्या विद्यार्थ्यांची SOF ऑलिम्पि...

प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रां...

देविदास पाटील आज अंतयात्रा

रवी महाजन व प्रमोद बारेला यांच्या संयुक्त विद्यमाने मुथखळा व...

“आरक्षण स्पष्ट… आता चोपडा नगरपालिकेच्या नेतृत्वाची दिशा ठरत...

चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद.. स्था...

आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अजित ...

विरवली गावात कृषिकन्यांनी केली चारा प्रक्रिया – स्वावलंबीतेच...

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची यावल प्रकल्प कार्यालयावर धड...

पाट पाणी कालव्याच्या दोन्ही बाजूने आरक्षित असलेल्या जागेबाबत...