ग.स.सोसायटी कडुन.."राजमाता जिजाऊ कन्या कल्याण" योजनेच्या माध्यमातून नवरी मुलीचा सन्मान. सभासदाच्या कुटुंबातील सदस्याचे हित जोपास...
ग.स.सोसायटी कडुन.."राजमाता जिजाऊ कन्या कल्याण" योजनेच्या माध्यमातून नवरी मुलीचा सन्मान.
सभासदाच्या कुटुंबातील सदस्याचे हित जोपासणे हे सत्कार्याचे काम करीत आहेत
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
ग.स.सोसायटी जळगांव च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमातून.सभासद हित जोपासण्यासोबतच,सभासदाच्या कुटुंबातील सदस्याचे हित जोपासणे हे सत्कार्याचे काम करत आहे.त्याअनुषंगानेच.आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी,प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद ता-चोपडा येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत,राजेंद्र शिवाजी पाटील यांची सुकन्या,चि.सौ.का.प्रांजली पाटील,हिच्या विवाह सोहळ्या प्रित्यर्थ.जळगांव गस सोसायटीच्या माध्यमातून "राजमाता जिजाऊ कन्या कल्याण" या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा हा धनादेश ग.स.सोसायटीचे सभासद कन्येला,हेडगेवारनगर ता-धरणगाव येथे माजी अध्यक्ष आर.एस.बाविस्कर सर यांच्या हस्ते..वधु चि.सौ.का.प्रांजलीला.प्रत्यक्ष सुपूर्त करण्यात आला.प्रसंगी.वधु पिता,चि.सौ.का.प्रांजली,गस सोसायटीचे संचालक-मंगेश भोईटे सर,योगेश सनेर सर, आदी मान्यवर हे उपस्थित होते.

No comments