रोटरी चोपडा व डॉ.सुरेशदादा नर्सिंग कॉलेज तर्फे अवयवदान जनप्रबोधन रॅली व व्याख्यान संपन्न दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,मुंबई व संयोज...
रोटरी चोपडा व डॉ.सुरेशदादा नर्सिंग कॉलेज तर्फे अवयवदान जनप्रबोधन रॅली व व्याख्यान संपन्न
दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,मुंबई व संयोजक रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन नाशिक यांची खान्देश अवयव दान जनप्रबोधन यात्रा नुकतीच चोपडा येथे आली होती.
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,मुंबई व संयोजक रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन नाशिक यांची खान्देश अवयव दान जनप्रबोधन यात्रा नुकतीच चोपडा येथे आली होती.त्यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडा व डॉ.सुरेश जी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश अवयवदान जनप्रबोधन यात्रा कार्यक्रमांतर्गत चोपडा शहरात अवयवदान जनप्रबोधन प्रभातफेरी तसेच त्या वेळी बसस्थानक,छञपती शिवाजी चौक,गांधी चौक या ठिकाणी नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी अवयवदान जनप्रबोधन पथनाट्य सादरी करण तसेच अवयवदान संदर्भात घोषणांनी जनजागृती केली.ह्या प्रभातफेरी नंतर एम.जी.कॉलेज येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे अवयवदान जनप्रबोधन हेतूने सायन्सच्या विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा घेण्यात आली,त्यात वरील विषयावर अत्यंत सुंदर,कल्पक व अभ्यासपूर्ण पोस्टर प्रदर्शन आयोजिण्यात आले होते.यानंतर एम् जी कॉलेजच्या स्मार्ट हॉल मध्ये अवयवदान जनप्रबोधन यात्रेचे व्याख्याते प्रशांत पागनिस व सुधीर बागाईतदार यांनी उपस्थित नर्सिंग कॉलेज - विज्ञान विभागाचे व इतर उपस्थित विद्यार्थ्यांना त्वचा दान, नेत्रदान,अवयवदान व देहदान यासंदर्भात अत्यंत सुंदर शब्दांत सोप्या पद्धतीने अभ्यास पूर्ण माहिती दिली.तसेच अयवदान - नेत्रदान,अंगदान बाबतच्या गैरसमजूती,त्यांची आवश्यकता,महत्त्व सोदाहरण पटवून दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रोटे.ॲड रुपेश घनश्याम पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्राचार्या करुणा प्रकाश चंदनशिव व आभार प्राणीशास्त्र विभागा प्रमुख डॉ.हनुमंत गोपाळराव सदाफुले यांनी मानलेत.यावेळी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँण्ड बॉडी डोनेशन मुंबई संस्थेचे अविनाश कुळकर्णी,नागराजन अय्यर,सुधीर व माधुरी बागाईतदार,चंद्रशेखर देशपांडे,अशोक जव्हेरी यांच्या सह रोटरी चोपडा प्रेसिडेट रोटे.चेतन टाटिया,सचिव रोटे.अर्पित अग्रवाल,नर्सिंग कॉलेज प्राचार्य करुणा चंदनशिव मॅडम,उपप्राचार्य.प्रा.डॉ.ए.एल्.चौधरी,ज्येष्ठ रोटे.एम्.डब्ल्यू.पाटील,रोटे.अभियंता व्ही.एस्.पाटील,रोटे मुख्या विलास पाटील,रोटे.पंकज बोरोले,रोटे.प्राचार्य सौंदाणकर,रोटे.सी.ए.पवन गुजराथी,रोटे विपुल छाजेड,रोटे.अरुण सपकाळे,रोटे.बी.एस्.पवार,इत्यादी रोटेरियन्स तसेच दादासाहेब डॉ.सुरेश दादा पाटील नर्सिंग कॉलेज प्राध्यापक वृंद,महात्मा गांधी कॉलेज प्राणी शास्त्र विभाग इत्यादीची उपस्थिती व सहकार्य लाभले .
No comments