महावितरण विभागास वेळोवेळी तोंडी व लेखी पञव्यहार करूनही शेतकऱ्यांच्या समस्या बाबत जागृत नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला डाॕ.चंद्रकांत ब...
महावितरण विभागास वेळोवेळी तोंडी व लेखी पञव्यहार करूनही शेतकऱ्यांच्या समस्या बाबत जागृत नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला डाॕ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात टाळेबंद करुन आंदोलन
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा शहरातील जुना शिरपुर रोड वरील उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात गौऱ्यापाडा,खाऱ्यापाडा,उमर्टी,व परिसरातील शेतकऱ्यांनी विज पुरवठा सुरळीत होत नाही याबाबत वेळोवेळो संबंधित कार्यालयाशी तोंडी व लेखी पञव्यवहार करुन देखील कोणती दखल घेतली नाही व नुसती खोटी आश्वासन उडवा उडवाची उत्तरे दिले व तसेच शेतातील पिकांना पाण्याचा अपूर्ण पुरवठा मिळाल्याने पिकांचे आतोनात नुकसान होऊन मातीमोल झाले व होत आहे.
अनियमित विज पुरवठा होत नसुन व महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारा मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आदिवासी भागातील सर्व शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी शरद पवार गट तर्फे १४ फेब्रुवारी रोजी डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय जुना शिरपूर रोडवरील उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला टाळेबंद करुन आंदोलन केले व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे डाॕ.चंद्रकांत बारेला यांनी चर्चा केली असता तरी देखील काही मार्ग निघाला नाही.त्यामुळे सर्व शेतकरी व डॉ.चंद्रकांत बारेला यांनी कार्यालयास टाळेबंद करुन आंदोलन केले.आंदोलन स्थळी,सचिन डाबे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस,अमोल राजपूत(शरद पवार गट युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख)उमर्टी सरपंच रिनेश पावरा,उपसरपंच उमर्टी सागर सांगोरे, बन्सी आप्पा सांगोरे,माजी सरपंच राजू पावरा,रमेश सांगोरे,इना पावरा माजी सरपंच,केदार पावरा,भाईदास पावरा,आपसिंग पावरा,गुंजऱ्या पावरा,प्रकाश पावरा,सायसिंग पावरा,दारासिंग पावरा,आदी शेतकरी आंदोलन स्थळी उपस्थित होते.चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोनि.मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अजित सावळे,पो उपनि.अनिल भुसारे,पोउपनि.योगेश्वर हिरे,सहाफौ.जितेंद्र सोनवणे,पोहेकॉ.संतोष पारधी,ज्ञानेश्वर जवागे,महेंद्र साळुंखे,शेषराव तोरे,प्रकाश मथुरे,विलेश सोनवणे यांनी आंदोलनास्थळी चोक बंदोबस्त ठेवला होता.
No comments