माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष पदी सचिन पाटील व सचिव पदी नंदकिशोर पाटील व सहसंघटक पदी विनोद पाटील तर ...
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष पदी सचिन पाटील व सचिव पदी नंदकिशोर पाटील व सहसंघटक पदी विनोद पाटील तर साक्री तालुकाध्यक्ष दिनेश वसईकर यांची निवड
जळगाव प्रतिनिधि
संपादक: हेमकांत गायकवाड
शिंदखेडा -प्रतिनीधी
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील यांच्या शिफारशीनुसार शिंदखेडा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत कामपूर गावात दि.10 रोजी बैठक खेळी मेळीच्या वातावरणात पार पाडली. प्रारंभी उपस्थित नुतन सभासद तसेच मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला व परिचय घेऊन सर्व सभासदांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्यांविषयी चर्चा करून समितीचा महत्वाचा विविध विषयांवर माहिती देण्यात आली बैठकीत. शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष सचिन साहेबराव पाटील तसेच तालुका सहसंघटक विनोद रमेश पाटील व तालुका सचिव नंदकिशोर संजय पाटील व साक्री तालुकाध्यक्ष दिनेश वसईकर याचि नियुक्तीपत्र व ओळखपत्र शिंदखेडा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे समितीतर्फे निवडीबद्दल त्याचे माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण बाधन,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी व जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी समितीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते




No comments