राष्ट्रवादी(शरद पवार गट)जिल्हा सरचिटणीस पदी लहूश नायदे यांची निवड चोपडा तालुक्याचे लाडके नेतृत्व विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय अरुण भाई...
राष्ट्रवादी(शरद पवार गट)जिल्हा सरचिटणीस पदी लहूश नायदे यांची निवड
चोपडा तालुक्याचे लाडके नेतृत्व विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच चोपडा तालुक्याचे लाडके नेतृत्व विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. चोपडा तालुक्यातील तरुणांनी राजकारणाकडे वळावे व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आपले पाठबळ द्यावे अशा भावना अरुण भाई गुजराथी यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला मा पंचायत समिती सभापती विनायकराव चव्हाण,चोपडा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शशिकांत पाटील,चोसाका संचालक शशिकांत देवरे,तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यांना विविध स्तरातून नेत्यांनी शुभेच्छा दिल्या माजी आमदार कैलास पाटील, चोसाका चेअरमन चंद्रहास भाई गुजराथी,मा.चेअरमन घनश्याम अण्णा पाटील,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगन्नाथ पाटील,डॉ.सेलचे तालुका अध्यक्ष डॉ.कांतीलाल पाटील पत्रकार प्रवीण पाटील,भैय्या नायदे,संजय पाटील पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
लहूशनायदे यांनी बोलताना चोपडा तालुक्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवू व शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत बनवू असे मत व्यक्त केले
No comments