गारपिटीने नुकसान झालेल्या पिकाला भरीव मदत द्या -स्वाभिमानीची मागणी दि.२६ फेब्रुवारी रात्री तालुक्यात वादळीवाऱ्यासह प्रचंड गारपिट झाल्याने ...
गारपिटीने नुकसान झालेल्या पिकाला भरीव मदत द्या -स्वाभिमानीची मागणी
दि.२६ फेब्रुवारी रात्री तालुक्यात वादळीवाऱ्यासह प्रचंड गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान
विशेष प्रतिनिधी अमोल बावस्कार
(संपादक: हेमकांत गायकवाड )
संग्रामपूर/जि.बुलढाणा
दि.२६ फेब्रुवारी रात्री तालुक्यात वादळीवाऱ्यासह प्रचंड गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. संग्रामपुर तालुक्यातील एकलारा ,बानोदा बु ,उमरा व काटेल शिवारातील पिके गारपिटीने जमीनदोस्त झाले असुन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.गहु, हरभरा, कांदा,संत्रा,केळी इत्यादी पिकांसह अनेक गावातील घरांची पडझड झाली आहे. गेल्या ५० वर्षात कधी येवढे नुकसान झाले नाही एवढे नुकसान २२ जुलैच्या अतिवृष्टीने झालेले आहे. ८ महिने उलटूनही शेतकरी नुकसानिच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रात्री गारपिटने झालेल्या नुकसानीचा सामना शेतकरी करु शकत नाहीत. सरकारने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरिव मदत अपेक्षित आहे. यामधे दिरंगाई झाल्यास शेतकरी-आत्महत्येचे सत्र अधिक वाढू शकते.या करीता तत्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी असे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करेल असा ईशारा यावेळी देण्यात आला.यावेळी स्वाभिमानीचे प्रविण येणकर, शिवा पवार योगेश घायल ,रुपेश अस्वार ,सतीश अस्वार ,भगवान गाडगे ,श्रीकृष्ण धर्मे ,भास्कर अस्वार ,विजय घायल ,भास्कर धर्मे ,शुभम अस्वार सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
No comments