adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा टॅलेंट हंट ( CTH) परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी संख्येचा नाविन विक्रम गाठला...

 चोपडा टॅलेंट हंट ( CTH) परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी संख्येचा नाविन विक्रम गाठला... इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण...

 चोपडा टॅलेंट हंट ( CTH) परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी संख्येचा नाविन विक्रम गाठला...

इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत एकूण 1324 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून नाविन विक्रम सिद्ध केला. 







प्रतिनिधी चोपडा 

संपादक: हेमकांत गायकवाड 

इयत्ता 1 ली , 4 थी आणि 7 वी च्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत एकूण 1324 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून नाविन विक्रम सिद्ध केला. परीक्षा ही दिनांक 4 फेब्रुवारी रविवार रोजी पंकज विद्यालय याठिकाणी मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच CBSE माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. *चोपडा टॅलेंट हंट आयोजन समिती* मार्फत परीक्षेसाठी मोठी आकर्षक बक्षिसे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेत याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा युगाची ओढ लागणे तसेच या स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी  सज्ज करणे होय. परीक्षा स्थळी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक श्री मिलिंद पाटील सर तसेच विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री मॅडम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना यशस्वी शुभेच्छा दिल्यात.





अनेक शिक्षक पालक तसेच चोपडा शहरातील आणि तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी परीक्षा स्थळी येऊन नियोजनात भाग घेतला. पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने या CTH परीक्षेसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊन मोठे योगदान या गुणवत्तापूर्ण सामाजिक कार्यात केले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री पद्माकर पाटील सर, गुरु क्लासेस संचालक श्री अश्विनी कुमार चौधरी सर तसेच समर्थ मॅथ्स अँड सायन्स अकॅडमी संचालक श्री घनश्याम पाटील सर व विशाल मराठे सर यांनी मुख्यतः परिश्रम घेतले. परीक्षेच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतलेत व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

No comments