adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गरिबीचं ओझं बाजूला ठेवत खचून न जाता जीवनात शैक्षणिक संघर्ष करा.. डॉ.सतिष बेहडे.. त्रिशा फाउंडेशन मार्फत कमला नेहरू वसतीगृहात ब्लॅंकेट वाटप

  गरिबीचं ओझं बाजूला ठेवत खचून न जाता जीवनात शैक्षणिक संघर्ष करा.. डॉ.सतिष बेहडे.. त्रिशा फाउंडेशन मार्फत कमला नेहरू वसतीगृहात ब्लॅंकेट वाट...

 गरिबीचं ओझं बाजूला ठेवत खचून न जाता जीवनात शैक्षणिक संघर्ष करा.. डॉ.सतिष बेहडे.. त्रिशा फाउंडेशन मार्फत कमला नेहरू वसतीगृहात ब्लॅंकेट वाटप




 चोपडा दि.५(प्रतिनिधी महेश शिरसाठ):


संपादक : हेमकांत गायकवाड 

जीवन हे अनेक समस्यांच्या काट्याकुट्यांनी भरलेले आहे त्यावर पुढे पुढे चालत राहणे  हा एकच पर्याय असून त्यात गरिबीचे  ओझं आडवे येऊ देऊ नका ते बाजूला सारून शैक्षणिक प्रगती साधल्यास तुम्ही  एक दिवस सुखाची फळें नक्की चाखणार  असे सणसणीत मार्गदर्शन नामवंत डॉक्टर सतिष बेहडे यांनी आदिवासी विद्यार्थींना संबोधित करताना दिले.

ते कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

 सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असून अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेल्या गरिबांना कुडकुडी भरून हाल होत असतील या गहन विचाराने व्यथित होऊन त्रिशा फाउंडेशनच्या  माध्यमातून  अध्यक्ष डॉ.सतिष बेहडे यांनी निकडवंत आदिवासी विद्यार्थींनींची भेट घेत प्रत्येकास ब्लॅकेट व खाऊ वाटप करून माणूसकीचे दर्शन घडविले.

याप्रसंगी  डॉ.प्रियंका बेहडे, उद्योगपती राजेंद्र मणियार,सौ.राधिका राजेंद्र मणियार,जयेश बेहडे,संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी, कर्मचारी शुभम साळुंखे,व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments