adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024

  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024  चोपडा तालुक्यातील सर्व नोडल अधिकारी व सहा. नोडल अधिकारी दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्र...

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 

चोपडा तालुक्यातील सर्व नोडल अधिकारी व सहा. नोडल अधिकारी दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न



प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन मा.गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली 04 रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत 10 - चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील चोपडा तालुक्यातील सर्व नोडल अधिकारी व सहा. नोडल अधिकारी दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न झाली.

                                                                   सदर बैठकीत मा.श्री गजेंद्र पाटोळे साहेब यांनी सर्व नोडल अधिकारी व सहा. नोडल अधिकारी यांचे कामाचे सविस्तर आढावा घेण्यात आला.   

1. पोस्टल बॅलेट (BTBPS) - मतपत्रीका देण्याबाबत कार्यवाही नमुना 12 D नुसार मतपत्रीका नोंदविणे तसेच टपाली मतपत्रीका ताब्यात घेणे व सुरक्षीत ठेवणे. टपाल मतपत्रीका अत्यावश्यक सेवा कर्मचारीसाठी पोस्टल बॅलेट व EDC देण्यात यावे. ज्या दिवशी मतदान राहील त्याच दिवशी पो.बॅ. देण्यात यावे. 

2. निवडणुक प्रशिक्षण नियोजन - सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षणाचे नियोजन करणे येत्या एप्रिल‍ महिन्यात पहिले प्रशिक्षण घेण्यात येईल व दुसरे प्रशिक्षण मे महिन्यात घेण्यात येईल. पहिल्या प्रशिक्षणासाठी अंदाजीत 1700 कर्मचारीसाठी 18 खोल्या आवश्यक आहेत. प्रशिक्षणा करीता EVM मशिन मागविण्यात येणार आहे. तसेच सुवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणे. प्रशिक्षणा दरम्यान दोन्ही सत्रातील चित्रीकरण (Video Graphic) करण्यात येणार आहे. 

3. तक्रार निवार आणि मतदार हेल्पलाईन - मतदारांसाठी 24 तास तक्रार निवारण (हेल्प लाईन) करीता टोल फ्री क्रमांक प्रसिध्दी करण्यात आले आहे. तक्राराची नोंद सबंधीता कडुन त्यावर चौकशी झाल्यावर अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविणे. इ.

4. निवडणुक साहित्य - प्राप्त झाले सर्व निवडणुक साहित्य नोंद घेणे मतदान केंद्रांना देवयाचे साहित्य, मतदान केंद्रानिहाय वाटप करणे व तसेच वितरणाच्या वेळेस वेळेवरलागणारे साहित्य पुरविण्यासाठी स्वतंत्र टेबलाचे नियोजन करणे. 

5. आचारसंहिता कक्ष ग्रामिण / शहरी भाग - निवडणुकीच्या काळात साठवनुक करण्यात आलेल्या साहित्य गोडाऊन वर छापे टाकणे. तसेच आचारसंहिता उल्लघंन झाल्यास याची वेळच्या वेळी माहिती वरीष्ठ कार्यालयास सादर करणे. 

6. मिडीया कक्ष - दैनिक बातम्यांचे अवलोकन करणे , मतदारसंघातील स्थानिक वृत्त पत्रातील, वाहिन्यांचे फेक न्युज तपासणे व सोशल मिडीयावर लक्ष ठेवणे व बातम्यांचा संग्रह ठेवणे 

  सदर बैठकीस अध्यक्षांसमवेत अति. सहा. निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार चोपडा, गट विकास अधिकारी मा. श्री रमेश वाघ, नायब तहसिलदार (निवडणुक) मा. श्री सचिन बांबळे, नायब तहसिलदार (महसुल) मा. श्री आर आर महाजन सर्व नोडल अधिकारी, सर्व सहा.नोडल अधिकारी उपस्थित होते.

No comments