लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चोपडा तालुक्यातील सर्व बॅंक शाखा व्यवस्थापक यांची दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्रामीण प...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024
चोपडा तालुक्यातील सर्व बॅंक शाखा व्यवस्थापक यांची दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न
प्रतिनिधी चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनषंगाने अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली 04 रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत 10 - चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील चोपडा तालुक्यातील सर्व बॅंक शाखा व्यवस्थापक यांची दिनांक 22 मार्च 2024 रोजी नविन प्रशासकीय इमारत ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ तहसिल कार्यालय चोपडा येथे बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत मा. श्री गजेंद्र पाटोळे यांनी सुचना दिल्या.
१. बॅंक खात्यातून जास्तीत जास्त १० लाखांपेक्षा जास्त रक्कम खात्यातून वितरीत करण्यात आली असल्यास तात्काळ कळविण्यात यावे.
२. तहसील कार्यालय नंतर सर्वात जास्त जनतेचे काम बॅंकेत असल्याने मतदार यांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात यावे...
3. सर्वांनी आपल्या बॅंक शाखेत निवडणूक काळात म.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे.
४. चोपडा मतदार संघात ४ विशेष मतदार केंद्र असणार आहेत.
५. सैनिक, दिव्यांग, वय ८५+ वरील सर्व मतदारां ना टपाली मतपत्रिका द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे.इ. सुचना देवून बैठक संपन्न झाली.
No comments