वडती येथे 40 वर्षांनंतर पवित्र शिवमहापुराण कथेचे आयोजन कथा पंडाल मे वही लोग आते है!जिनको बाबा भोलेनाथ बुलाते है!!महंत प्रा. हभप सुशिलजी म...
वडती येथे 40 वर्षांनंतर पवित्र शिवमहापुराण कथेचे आयोजन
कथा पंडाल मे वही लोग आते है!जिनको बाबा भोलेनाथ बुलाते है!!महंत प्रा. हभप सुशिलजी महाराज
चोपडा तालुका ग्रामीण प्रतिनिधी : राजेंद्र कोळी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वडती गावात तब्बल 40 वर्षांनंतर पवित्र श्री. शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे पवित्र श्री.शिवमहापुराण कथेला मुस्लिम बांधवांनी ची उपस्थिती होती.
वडती येथील 5 दिवसांसाठी पवित्र शिवमहापुराण कथेस कथाव्यास :- महंत प्रा. हभप सुशिलजी महाराज, विटनेरकर (सद्गुरु संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज) यांचा पवित्र वाणीतुन कथेस सुरुवात करण्यात आली. यावेळी गायणाचार्य :- हभप ऋषिकेश महाराज,वढोदा हभप वसंत महाराज, तरडी वेशभूषाकार :- हभप नरेश महाराज,अमळनेर, ढोलक वादक :- हभप कल्पेश महाराज,कुरवेल, बेंजो वादक :- बुधा मास्टर , भुसावळ याचे सहकार्य लाभले.श्री.शिवमहापुराण कथा आयोजन समिती वडती यांच्या कडुन भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.समस्त वडती ग्रामस्थ यांच्या कडुन उत्तम नियोजन असुन,अतिशय उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.श्री.शिवमहापुराण कथेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थित लाभत आहे.


No comments