शासकीय उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे भूलतज्ञ व एम. .डी. डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी सखाराम अरुण सोनवणे, अध्यक्ष-चोपडा तालुका, एकलव्य स...
शासकीय उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे भूलतज्ञ व एम. .डी. डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी
सखाराम अरुण सोनवणे, अध्यक्ष-चोपडा तालुका, एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी चोपडा येथील तहसीलदार यांचेकडे केली निवेदनाद्वारे मागणी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आम्ही शासकीय उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे व्हिजीट करीत असतांना, आमच्या निर्दशनास या दोन गोष्टी आल्या शा. उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे सर्वात जास्त आदिवासी समाज जात असतो, चोपडा तालुका हा आदिवासी तालुका असून देखील सातपुडा डोंगर, नदी-नाल्यामध्ये राहणारे आदिवासी समाजाकडे आपले उदरनिर्वाह करण्यापुरते पैसे असतात व दवाखान्यात उपचार करण्यासाठी पैसे नसतात तसेच आरोग्य समस्ये साठी रुग्णालयात भूल तज्ञ डॉक्टर नसल्याने आदिवासी गरीब रुग्णाला २-३ हजार रुपये खर्च करुन बाहेरुन भूल तज्ञ बोलावावा लागतो, परंतु आम्हा गरीब आदिवासीजवळ एवढे पैसे नसल्याने त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महोदय, आम्ही आपणांस अशी विनंती करतो की, आपण याकडे गांभीर्याने लक्ष देवून तसेच वरीष्ठांकडे आमची तक्रार पोहचवून व पत्रव्यवहार करुन शा. उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे एकभूल तज्ञ एम. डी. डॉक्टर ची नियुक्ती करुन मिळावी ही आग्रहाची नम्र विनंती. आदिवासी समाजातील लोक हे १००-२०० रुपयाने मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवीत असतो. आणि उपजिल्हा रुग्णालयात एम.डी. भूल तज्ञ डॉक्टर नसल्याने हा त्रास गोर गरीब आदिवासी समाजाला भोगावा लागतो. तहसीलदार साहेब आपण तालुक्याचे दाता असुन या नजरेने आम्ही आदिवासी समाज आपल्याकडे पाहतो म्हणुन आम्ही दिलेल्या अर्जाची आपण पूर्ण चौकशी करुन आम्हा आदिवासी समाजाला न्याय मिळवून दयाल म्हणुन आम्ही आदिवासी समाज आपल्याला आमचे दाता ही उपमा देवून आपणांस विनंती अर्ज करतो की, आम्हाला तुम्ही न्याय मिळवून दयाल ही नम्र विनंती.
अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील तहसीलदार यांना देण्यात आले असून या निवेदनावर खालील प्रमाणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत
आपले विश्वासू
आदिवासी समाजातील खालील सहया करणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी
१. भूषण मधुकर भिल.
२ ज्ञानेश्वर मगन अहिरे
३. संजू राजू भिल
४. समाधान भग
५. महेंद्र शिवा भिल
६. अजय बापू भिल
७. कल्पेश दिलीप भिल
८. अर्जुन विश्वास भिल
९. सुनिल गोपीचंद भिल
१०. रतन किशोर भिल
११. आबा नामदेव भिल
१२. भुषण किशोर भिल
१३. वासुदेव गोमा भिल
१४. सुशिल भाऊराव सोनवणे
१५. बळीराम लालचंद भिल
१६. अतुल काशिनाथ भिल
१७. भिकन दौलत भिल
१८. जगदीश रामदास भिल
१९. सोमा बापू भिल
२०. सोमनाथ भाईदास भिल
२१. दुर्योधन रामदास ठाकरे


No comments