adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची ऐतिहासिक बस अयोध्या दर्शनासाठी रवाना

  जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची ऐतिहासिक बस अयोध्या दर्शनासाठी रवाना विभाग नियंत्रक  भगवान जगनोर यांच्या हस्ते शुभारंभ जळगाव जिल्हातुन प्र...

 जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची ऐतिहासिक बस अयोध्या दर्शनासाठी रवाना

विभाग नियंत्रक  भगवान जगनोर यांच्या हस्ते शुभारंभ



जळगाव जिल्हातुन प्रथमच चोपडा आगाराची ऐतिहासिक बस चहार्डी ते अयोध्या साठी विभाग नियंत्रक भगवान जगनोर व आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन रवाना केली

चोपडा(प्रतिनिधी) 

(संपादक:हेमकांत गायकवाड)

राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन "अयोध्या दर्शन"बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते आज दिनांक २० मार्च रोजी करण्यात आला.जळगाव जिल्हातुन प्रथमच चोपडा आगाराची ऐतिहासिक बस चहार्डी ते अयोध्या साठी विभाग नियंत्रक    भगवान जगनोर व आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन रवाना केली.अयोध्या दर्शन बस बुकींग साठी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रमाने डी डी चावरे,विलास सोनवणे,निंबा ताराचंद पाटील,शालिक किसन भोई  या चहार्डीकरांच्या अनमोल सहकार्याने चहार्डी येथील भोई वाड्यातील प्रभु श्रीराम भक्तांनी एकसंघ पध्दतीने आगारातुन बस बुकींग करण्यात आली होती.सदर बस मध्ये शरदचंद्र रामभाऊ सोनवणे,अशोक सिताराम पाटील, ललित दोधा पाटील,निंबा पाटील, शालिक भोई सह चहार्डी येथील भा‌विक रवाना झाले.सदर बसची सजावट व पुजा करून सवाद्य मिरवणुक काढुन जय श्रीरामाच्या जय  रवाना झाली.यावेळी  सहाय्यक यंत्र अभियंता निलेश चौधरी,पालक अधिकारी किशोर महाजन,संदेश क्षीरसागर, नितीन सोनवणे,सागर सावंत, सिध्दार्थ चंदनकर डि डि चावरे,संजय सोनवणे, चंद्रभान रायसिंग,अनिल पालीवाल, श्रीकांत नेवे, भगवान नायदे,उमेश नगराळे,अतुल पाटील,  नरेंद्र जोशी,दिपक पाटील सह कर्मचारी,प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments