महाराष्ट्र कोळी समाज संघ मध्ये महिला व युवकांची प्रवेश करून पद नियुक्त्या जाहीर घाटाखाली शहर व तालुक्यातील महिला व युवकांची शासकीय विश्रा...
महाराष्ट्र कोळी समाज संघ मध्ये महिला व युवकांची प्रवेश करून पद नियुक्त्या जाहीर
घाटाखाली शहर व तालुक्यातील महिला व युवकांची शासकीय विश्राम गृह मलकापूर येथे बैठक संपन्न होऊन पद वाटप करून नियुक्ती जाहीर
अमोल बावस्कार मलकापूर विभाग प्रमुख
( संपादक :हेमकांत गायकवाड )
मलकापुर:-
समाजाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली महाराष्ट्र कोळी समाज संघ स्व. अनंत तरे, प्रदेश अध्यक्ष जयेश तरे यांचा विचार प्रेरणेने विदर्भ अध्यक्ष दीपक वाघ जिल्हा अध्यक्ष किशोर नेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटाखाली शहर व तालुक्यातील महिला व युवकांची शासकीय विश्राम गृह मलकापूर येथे बैठक संपन्न होऊन पद वाटप करून नियुक्ती जाहीर करण्यात आली यामध्ये नांदुरा तालुका युवा अध्यक्ष किसन बावस्कार, मलकापूर युवा उपाध्यक्ष विनोद धामोडे,तालुका युवा साचिव भुषण धाडे,महिला तालुका युवा अध्यक्षा रुपाली कांडेलकर, तालुका उपाध्यक्षा भारती सोनोने, मलकापूर तालुका युवा सचिव निकिता घुगरे,मलकापूर शहर युवा अध्यक्षा रेखा बावस्कार यांची नियुक्ती करण्यात आली
यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष अमोल बावस्कार,महिला जिल्हा युवा अध्यक्षा रोहिणीताई इंगळे, जिल्हा युवा सचिव शुभम घुले, तालुका अध्यक्ष वासुदेव सोनोने,युवा अध्यक्ष विजय कांडेलकर उपस्थित असून आता कोळी समाजातील महिला भगिनींनी महिला सशक्तीकरण करून समाजहिताच्या सेवा कार्यासाठी घराबाहेर निघण्याची गरज आहे असे बुलडाणा जिल्हा युवा अध्यक्षा रोहिणी इंगळे यांनी कळविले.



No comments