सध्याची मुले फास्ट आहेत जेष्ठ कलाशिक्षक वासुदेव शेलकर यांचे प्रतिपादन भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र,चोपडा येथे *साद-प्रतिसाद* ...
सध्याची मुले फास्ट आहेत जेष्ठ कलाशिक्षक वासुदेव शेलकर यांचे प्रतिपादन
भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र,चोपडा येथे *साद-प्रतिसाद* स्नेहसंमेलनानिमित्त *चित्रगंध* या वार्षिक चित्रकला प्रदर्शनाचा उद्घाटन
प्रतिनिधी चोपडा
( संपादक : हेमकांत गायकवाड )
चोपडा :-
भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र,चोपडा येथे *साद-प्रतिसाद* स्नेहसंमेलनानिमित्त *चित्रगंध* या वार्षिक चित्रकला प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या चित्रकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या उत्कृष्ट वर्गकाम व विविध स्पर्धांना पाठविलेल्या एकूण 225 कलाकृती मांडल्या होत्या. पेन्सिल स्केचिंग,निसर्ग चित्र, व्यक्ती चित्रण, मुद्राचित्र, डिझाईन, कार्यानुभव अंतर्गत कागद काम व माती कामाची शिल्पे व शैक्षणिक साहित्य निर्मिती उत्कृष्ट छायाचित्रण, रचनाचित्र असे विविध विषयांवर अनेक माध्यमातील चित्रे लावण्यात आले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात ए. टी. डी. द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी इशस्तवना पासून केली. नंतर स्वागत गीत झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुनील बारी यांनी केले. सौ पूनमबेन गुजराथी या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कलाशिक्षक उद्घाटक मा. वासुदेव शेलकर, प्रमुख पाहुणे मिलिंद निकम, नांदेड इंग्लिश स्कूल, नांदेड व राजेंद्र नाईक, संचालक, अपर्णा ड्रॉइंग क्लासेस, अमळनेर यांच्यासह उपाध्यक्षा
छायाबेन गुजराथी, सौ.निता अग्रवाल, श्री आशिषलाल गुजराथी श्री जीवनभाऊ चौधरी हे देखील उपस्थित होते.
प्रदर्शन प्रमुख प्रा.संजय नेवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. परिचया नंतर *साद-प्रतिसाद* *चित्रगंध* प्रदर्शनाचे फीत कापून व दीप प्रज्वलन करून मातृूूतुल्य सुशीलाबेन शहा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. चित्र प्रदर्शनाचे अवलोकनानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले याप्रसंगी चोपडा तालुक्यातील गौरव प्राप्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त माजी प्राचार्य राजेंद्र महाजन,प्रा.संजय नेवे,पंकज नागपुरे,कमलेश गायकवाड, तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते,रतिलाल सोनवणे, पिंजारी शकील अहमद शेख, सिराज तडवी, सचिन शुक्ल, नुसरत जहाॅ रियाजोद्दीन, अनिलराज पाटील व श्री भूषण मांडे या कलाशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले.
यात पायाभूत वर्गातून प्रथम- बडगुजर हर्षदा नरेंद्र, अमळनेर, द्वितीय- बारी संचिता संजय चोपडा, तृतीय -पाटील तनुश्री अजय, चोपडा,
ए.टी.डी. प्रथम वर्ष वर्गातून अनुज अनिल बडगुजर, चोपडा द्वितीय -पाटील कृष्णा उमेश, चहार्डी,तृतीय-पावरा कुंभा-या दमण्या.
ए.टी.डी.द्वितीय वर्षातून प्रथम -दिव्या राजेम सैतवाल, जामनेर, द्वितीय-मेघना विनोद बनसोडे अंमळनेर, तृतीय- सुरेश छगन बारेला.
जी. .आर्ट मधून प्रथम-वसावे अर्चना वनसिंग, द्वितीय- विनल अरुण गुजर.
तसेच *उत्कृष्ट स्केचिंग* साठी वसावे अर्चना,*Specifically चित्रासाठी* प्रमोद वारूळे *उत्कृष्ट छायाचित्रणासाठी* सागर नाथबुवा, *उत्कृष्ट सहल अनुभव* लेखनासाठी सागर नाथबुवा व *आदर्श विद्यार्थिनी* म्हणून दिव्या सैतवाल,अशी बक्षिसे व भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नंतर यावेळी श्री वासुदेव शेलकर यांचे मनोगतात आपल्या विद्यार्थी जीवनाची तुलना आजच्या विद्यार्थ्यांची करत आजचे विद्यार्थी फास्ट आहेत ते कमी वेळात अधिक ज्ञान मिळवितात असे प्रतिपादन करत अनेक अनुभवांद्वारे कलेतून पैसा कसा मिळवता येतो.यावर त्यांनी प्रकाश टाकत मेहनत करत रहा असे सांगितले...स्नेहसंमेलना प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. तर सूत्रसंचालन कु स्नेहल पाटील व सागर नाथबुवा यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अनेक कलाशिक्षक इनरव्हील क्लबच्या वंदना पाटील, मीना पोतदार, संस्थेच्या उपाध्यक्ष छायाबेन गुजराथी, उपप्राचार्य डाॅ.आशिष गुजराथी,मुख्या. सुनील चौधरी, मुख्या. अरुण संदाणशिव, मुख्या. डॉ. संजय चौधरी,प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर,
मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी, तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी..पर्यवेक्षक वसंत नागपुरे,जेष्ठ कलाशिक्षक मच्छिंद्र महाले,सौ.ज्योती कोठारी इ. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रदर्शनाचे विशेष आकर्षण कलात्मक सेल्फी थ्रीडी पॉइंट ठरले आहे.
यशस्वीतेसाठी लिपीक भगवान बारी,सेवक अतुल अडावदकर,प्रविण मानकरी यांनी अनमोल सहकार्य केले.



No comments