सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य,प्रतिकृती प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी शि...
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य,प्रतिकृती प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिक्षकांनी सोलर सिस्टिम, जलचक्र, वनस्पती पेशी चक्र, विविध राज्यांच्या राजधानी दाखवणारे यंत्र, पवन ऊर्जा, शेती अशा प्रकारे विविध शैक्षणिक साधने तयार करून त्यांचे प्रदर्शन
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 7 मार्च रोजी शैक्षणिक साहित्याचे,प्रतिकृती प्रदर्शन तसेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनिता वानखेडे असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नारायण खडके व डॉ जयवंत शिंपी होते. सदर कार्यक्रमात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिक्षकांनी सोलर सिस्टिम, जलचक्र, वनस्पती पेशी चक्र, विविध राज्यांच्या राजधानी दाखवणारे यंत्र, पवन ऊर्जा, शेती अशा प्रकारे विविध शैक्षणिक साधने तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील, डॉक्टर जयश्री पाटील, प्रा सुवर्ण अहिरे, तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल पंकज वाघ,लिपिक अरविंद पवार, चंद्रकांत सपकाळे यांनी सहकार्य केले.

No comments