adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेर येथे मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळीस अटक

अमळनेर येथे मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळीस अटक   मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळी स्थान...

अमळनेर येथे मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळीस अटक

 मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

किसन नजन पाटील,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव यांना गोपनीय माहिती मिळाली की,अमळनेर शहरातील मनिष उर्फ सनी महाजन हा त्याचे साथिदार यांचे सोबत मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करीत असल्याची माहिती मिळाली.त्यावरून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करणे बाबत किसन नजनपाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोह संदिप पाटील,कमलाकर बागुल,प्रविण मांडोळे,गोरख बागुल,राहुल बैसाणे,अशोक पाटील सर्व नेमणुक स्थनिक गुन्हे शाखा पथकास रवाना करुन पुढील कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.


त्यावरून वर नमुद पथकाने अमळनेर शहरात जावून मिळलेल्या बातमी प्रमाणे मनिष उर्फ सनी महाजन याची माहिती काढून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावे मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन,रा.शिरुड नाका,श्रीराम कॉलनी अमळनेर असे सांगीतले. त्यावेळी त्यास मिळालेल्या बातमीची विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांने त्याचे सोबत साथीदार शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील,रा.राजाराम नगर अमळनेर,निखील संतोष चौधरी,रा.राजाराम नगर अमळनेर अश्यांचे नाव सांगीतल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी त्यांचा अजुन एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी,रा.रामेश्वर कॉलनी अमळनेर असा असून तो सध्या नाशिक जेल मध्ये असल्याचे सांगीतले.ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी अमळनेर पो.स्टे. चे 1)CCTNS NO 578/2022, IPC 379, 2) CCTNS NO 591/2022, IPC 379, 3) CCTNS NO 47/2023 IPC 379, 4) CCTNS NO 135/2023, IPC 379, 5) CCTNS NO 504/2023 IPC 379 या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच आरोपी मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन,रा.शिरुड नाका,श्रीराम कॉलनी अमळनेर याचे कडून १ चोरीची मोटार सायकल मिळाली असून सदर मोटार सायकल बाबत तपास केला असता त्याबाबत नाशिक जिल्ह्यातील आडगाव पो.स्टे.ला गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली आहे.तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक,जळगाव,कविता नेरकर,अपर पोलीस अधीक्षक,चाळीसगाव,सुनिल नंदवालकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहिती नुसार 

इको गाडीचे सायलन्सर ची किमंत ८० हजार रुपये असल्याने साईलन्सर चोरीस जातात

कारण असे की सदर इको गाडीचे सायलन्सर मधील माती १५ हजार रुपये किलोच्या हिशोबाने विक्री होते व इको गाडी मधील सायलन्सर चोरने फार सोपे आहे चोर त्या मधील सायलन्सर चोरुन त्यामधील माती काढुन टाकतात व त्यामधील माती घेण्या करिता उत्तरप्रदेश येथुन व्यापारी येतात त्या माती मध्ये प्लॕटीनम निघतो व प्लॕटीनम म्हणजे व्हाईट बोल्ट यामुळेच इकोगाडीचे सायलन्सर चोरी होते. 

No comments