अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य याच्या संयोगाने या वषार्चे सहावे “मुक्ता साळवे साहित्य सास्कृितक संमेलन” रविवार दिन...
अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य याच्या संयोगाने या वषार्चे सहावे
“मुक्ता साळवे साहित्य सास्कृितक संमेलन” रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी डॉ. निमर्ल कुमार फडकुले सभागृह सोलापर येथे पार पडले
(संपादक: हेमकांत गायकवाड)
मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने दर वर्षी साहित्य क्षेत्रांतील
कार्याबद्दल साहित्य संमेलनामध्ये साहित्यीक पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षीचा साहित्यिक पुरस्कारासाठी श्री लालासाहेब जाधव यांनी लिहिलेल्या “परका” (आत्मकथन) या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. श्री. लालासाहेब जाधव यांनी त्यांच्या “परका” या पुस्तकात त्यांची आत्मकथन स्वरूपातील लिखाण केलेले आहे. त्यांना इतर समाजाकडून मिळालेली अस्पश्यतेची वागणकू, राज्यातील
कैकाडी समाज हा विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती (अ) या मागासवगीर्य प्रवगार्मध्ये समाविष्ट आहे.आज देखील कैकाडी समाजाच्या अनेक कुटुंबांमध्ये अठराविश्व दारिद्र्य आहे
या समाजाचा अज्ञनपणा, त्यांच्यातील बुजरेपणा, गावापासून लांब राहणारा, गुन्हा नसताना देखील शिक्षा भोगणारा,पोट
भरण्यासाठी गावोगावी सतत फिरुन उदर निर्वाह करणारा, न्यायापासून वंचित असलेला, अज्ञात रुपी अंधकारात गुरफटलेला, अस्पश्यतेची जोखंड खांद्यावर घेऊन फिरणारा आज देखील काही प्रमाणात
गावोगावी फिरताना गाव कुसा बाहेर वास्तव्य करत असताना दिसतो. जीवनशैली मध्ये लेखक श्री. लालासाहेब जाधव यांना लहान पणा पासुन नोकरीला लागेपर्यंत आलेले अनुभव त्याच प्रमाणे त्यांच्या
वाट्याला आलेले उपेक्षितांचे जिवन तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली हीन वागणुक या बाबतचे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या “ परका ” या पुस्तकात लिहलेले आहे.
त्याच्या *“ परका ”* या
पुस्तकातील एक – एक प्रसंग वाचताना अकरश: अंगावर शहारे आणणारे आहेत. *“ परका ”* हे पुस्तक वाचताना मनाला अत्यंत वेदना व दु:ख होते.
श्री लालासाहेब जाधव व त्यांच्या कुटूंबांना जे वाट्याला आलेले उपेक्षितांचे जिवन ते जगले,
अनेकांकडून झालेला अन्याय सहन केला, जे सोसलं, जे भोगलं
त्याचे ह्रदयद्रावक प्रसंग त्यांनी त्यांच्या पुस्तकात शब्द बद्ध केले आहेत आणि म्हणुनच सोलापुर येथे झालेल्या राज्य स्तरीय सहाव्या सत्यशोधक
मुक्ता साळवे साहित्य संमेलनामध्ये या पुस्तकाची निवड करुन *“परका”*या पुस्तकास अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेकडून साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील डॉ. निमर्ल कुमार फडकुले सभागृहात आयोजित सहाव्या सत्यशोधक मुक्ता साळवे
साहित्य व सांस्कृितक संमेलनात श्री.लालासाहेब जाधव यांना उपरोक्त पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत, साहित्यीक दत्ता गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह
देऊन श्री लालासाहेब जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी संयोजक मुक्ता साळवे
साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन बगाडे, निमंत्रक यशवंत फडतरे, श्रीमती जाधव, सािहित्यका लक्ष्मी यादव, डॉ. प्रा. विनता चंदनिशवे, जेष्ठ विचारवंत अशोक आगवणे, जेष्ठ सामािजक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण माने सर व कस्तुरा जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते
इत्यादी मान्यवर उपिस्थत होते.

No comments