आसेमं आदिवासी सेवा मंडळ चे विविध मागण्यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा( राजु ) बिर...
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा( राजु ) बिर्हाम तडवी यांचे नेतृत्वात फैजपुर उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी फैजपुर विभाग यांना आसेमं आदिवासी सेवा मंडळ व आदिवासी तडवी भिल समाज बांधवांनी विविध विषयांवर भेट घेऊन निवेदन सादर केले व लक्ष वेधून अडचणी सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली
प्रतिनिधी /फैजपुर ता.यावल
( संपादक : हेमकांत गायकवाड )
फैजपुर :-
उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांना आसेमं चे विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांना दिले निवेदन आज आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा( राजु ) बिर्हाम तडवी यांचे नेतृत्वात फैजपुर उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी फैजपुर विभाग यांना आसेमं आदिवासी सेवा मंडळ व आदिवासी तडवी भिल समाज बांधवांनी विविध विषयांवर भेट घेऊन निवेदन सादर केले व लक्ष वेधून अडचणी सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली यात
१) आदिवासीना डिलीस्टींग च्या नावाखाली धर्माचे ओअनुकरणाचे स्वातंत्र्यावर गदा व हुकूमशाही दिसून येत आहे. परंतु शासन स्तरावरील कोणत्याही फार्मावर किंवा अर्जावर आदिवासींना धर्म कोड म्हणून आदिवासी कोडाची नोंद नसते म्हणून विनाकारण आदिवासींना इतर धर्म कोडावर नोंद करावी लागते. यादृष्टीने आम्हास स्वतंत्र आदिवासी धर्म कोड मिळावा.
२) आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनदावे लवकर मंजुर करून, वाटप करावे. ३) महसुल व ग्रामपंचायत चे गायरान, गावठाण हे बेघर निराधार आदिवासींना भोगवटा लावून शबरी घरकुल पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा.
४) आदिवासी व गरजु समाज बांधवांची प्रलंबित संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ बालसांगोपण योजनेची प्रलंबित प्रकरणांना त्वरीत मंजुरी द्यावी.
५) आदिवासी समाजाकरीता जळगांव जिल्ह्यातील रावेर यावल चोपडा तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी भवन शासकीय भूखंडावरील जागा उपलब्ध करून आदिवासी भवन बांधण्यात यावेत आदिवासी विकास विभागाचे निधीतून तरतूद करण्यात यावी.
६) आदिवासी तडवी भिल समाजासाठी पारधी विकास आराखडा प्रमाणे तडवी भिल विकास आराखडा मंजूर करण्यात यावा व निधीची तरतूद करण्यात यावी.
७) आदिवासी तडवी मिल समाजासाठी अंत्योदय अन्नपूर्णा अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी उद्दिष्ट वाढवावे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांना वस्तू, संस्कृती जतन, संवर्धन, प्रदर्शन, चाली रिती रिवाज अविरत अबाधित व संस्कृतीचे संवर्धनासाठी पुणे टीआरटीआय आदिवासी संग्रहालय जळगांव जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कांतिकारक बिरसा मुंडा संग्रहालय निर्माण करण्यात यावे.
शासकिय जनगणनेत आदिवासींना आदिवासी धर्म कोड लागू करावा व शैक्षणिक बोंदीमध्ये आदिवासी धर्म कोड देण्यात यावा. ही नम्र विनंती.
• सातपुडा डोंगर पायथ्याशी आदिवासीना गावातील नागरिकांना कैम्प घेऊन रेशनकार्ड वाटप करणे आदिवासी समाज बांधवांची जातीची त्वरित वितरीत करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकारी तथा फैजपुर उपविभागीय अधिकारी सन्मानिय देवयानी भाप्रसे यादव यांना निवेदन देण्यात आले यावेळी आसेमं चे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा राजु बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक अली खाँ तडवी उपाध्यक्ष वसीम महेबुब तडवी शहराध्यक्ष रसीद बाबु तडवी मुनाफ यासिन तडवी सामाजिक कार्यकर्त्या हसीना तडवी असलम सलीम तडवी मुनाफ यासिन तडवी मनोज लालखा सावदा समशेर मिस्तरी अलाउद्दीन (गोंडू) तडवी राजेश नबाब मरेखा सायबु इक्बाल संजू इस्माईल वकील राजू छबू चिंचाटी तर कार्यालयीन सहकार्य म्हणून मंडळाधिकारी हनिफ तडवी अय्युब तडवी यांनी केले तर फैजपूर उपविभागीय अधिकारी सन्मानिय देवयानी यादव भाप्रसे यांनी निवेदन स्वीकारले व मुख्य मागण्या तात्काळ मान्य करीत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन आसेमं परिवार च्या शिष्टमंडळाला दिले



No comments