adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

८५ + वय असलेले तसेच अपंग मतदार असलेल्या मतदारांना घरपोच टपाली मतपत्रिका सुविधा उपलब्ध, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  च्या अनुषंगाने बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण   ८५ + वय असलेले तसेच अपंग मतदार असलेल्या मतदारांना ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
 च्या अनुषंगाने बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण  
८५ + वय असलेले तसेच अपंग मतदार असलेल्या मतदारांना घरपोच टपाली मतपत्रिका सुविधा उपलब्ध 


चोपडा प्रतिनिधी 

( संपादक हेमकांत गायकवाड )

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने लोकसभा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत १० - चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील विभाग बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांची दिनांक १६ मार्च २०२४ रोजी नगरपालिकेचे नाट्यगृह चोपडा येथे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.सदर प्रशिक्षणामध्ये गजेंद्र पाटोळे यांनी बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक प्रत्येकाने आपले केंद्र पाहणे व प्रत्येक आवश्यक सुविधा उपलब्ध सुविधेची पाहणी करावी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण लवकरात लवकर घेण्यात येईल.सर्व बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक शंकांचे निराकरण करण्यात आले.चोपडा तहसिदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिलेल्या सुचना 


 १.आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रम लवकर घोषित होईल.२.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ कामी,८५ + वय असलेले तसेच अपंग मतदार असलेल्या मतदारांना घरपोच टपाली मतपत्रिका सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.३.गर्भवती महिलांना मतदानाच्या दिवसी बसण्याची सोय करणे.४.पर्यवेक्षक बीएलओ यांना स्थलांतरित व मयत लोकांची महिती दोन प्रतीत याद्या ठेवणे.५ सर्व बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांना काही मदत किवा अडचणी आल्यास त्यांनी निवडणूक शाखेशी संपर्क साधने.सदर प्रशिक्षणास निवडणुक नायब तहसिलदार सचिन बांबळे,पुरवठा नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर तसेच नोडल अधिकारी मीडीया वंदना दाभाडे,व सहाय्यक नोडल अधिकारी मुकेश सोनवणे तसेच सर्व नोडल अधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments