adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकसभेच्या निवडणुका जाहीर

  लोकसभेच्या निवडणुका जाहीर राज्यात ५ टप्प्यात होणार लोकसभेच्या निवडणुका! केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्यानंत...

 लोकसभेच्या निवडणुका जाहीर

राज्यात ५ टप्प्यात होणार लोकसभेच्या निवडणुका!

केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली 



प्रतिनिधी मुंबई


(संपादक : हेमकांत गायकवाड)


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राज्यात पहिला टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये पहिला टप्प्यासाठी १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. तर देशभरातील सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

राज्यात ५ टप्प्यात होणार लोकसभेच्या निवडणुका!

पहिला टप्पा

१९ एप्रिल

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 

२६ एप्रिल

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा

०७ मे

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा

१३ मे 

बीड, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी

पाचवा  टप्पा

२० मे

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण

No comments