मनास सुन्न करणारी घटना २५ वर्षीय विवाहितेचा गळादाबून खून आरोपी नवरा सासू सासरे पोलिसांच्या ताब्यात स्वाती चा नवरा सासू-सासरे यांनी घरात ...
मनास सुन्न करणारी घटना
२५ वर्षीय विवाहितेचा गळादाबून खून
आरोपी नवरा सासू सासरे पोलिसांच्या ताब्यात
स्वाती चा नवरा सासू-सासरे यांनी घरात गळा दाबून तिचा खून केला व मेल्यानंतर तिच्या तोंडात विषारी द्रव्य टाकले
सिंदखेड राजा (शहर प्रतिनिधी)
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुळजापूर येथील २५ वर्षीय विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नवरा सासू-सासरे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना २७ मार्च रोजी दुपारी घडली आहे.
सविस्तर हकीकत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की स्वाती हीचे लग्न सन २०१९ मध्ये तुळजापुर ता.देउळगांव राजा येथील दिपक भगवान तिडके यांचे सोबत समाजाचे रिती रिवाजा प्रमाणे झाले होते.तेव्हा पासुन ती तीचे सासरी तुळजापुर येथे राहते.तिला एक चार वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा आहे.तिचे व तिचा पती दिपक यांचेत घरगुती कारणावरुन नेहमी वाद होत होते.लग्न झाल्यानंतर सात महीण्यातच तिचे पतीने त्याचे आई वडील यांचे सांगणेवरुन व तीचे चारित्र्यावर संशय घेवुन मुलगी स्वाती हीला मारहाण केल्याने तिला माहेरी चिरबंदी दे राजा येथे घेवुन आलो होतो.तेव्हा ती अडीच वर्ष
माहेरीच होती.त्यानंतर नातेवाइकांचे मध्यस्थीने तीला नांदवणे करीता सासरी पाठविण्या करीता तिचे पती
दिपक याचे कडुन बाॕड पेपर वर लीहुन घेवुन यांचेत वाद मिटवुन तिला तिचे सासरी पाठवुन दिले होते.त्यानंतर दिनांक २७/०३/२०२४ रोजी दुपारी ०२.३० वा सुमारास स्वाती चा नवरा सासू-सासरे यांनी घरात गळा दाबून तिचा खून केला व मेल्यानंतर तिच्या तोंडात विषारी द्रव्य टाकले व तिला सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेची फिर्याद ग.भा.जमुनाबाइ लक्ष्मण खांडेभराड वय ६४ वर्ष यांनी दिली आहे स्वाती हीला घरगुती कारण व तीचे चारित्र्यावर संशय घेवुन तिचा पती दिपक भगवान तिडके,सासु जिजाबाई तिडके,सासरे भगवान शामराव तिडके यांनी तिचा गळा दाबुन ठार मारलेचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे त्यामुळे सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अन्वे 302,34 अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत
No comments