गटविकास अधिकारी चोपडा यांना दिले निवेदन मनमानी कारभाराची वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नाही म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य व वर्डी ग्र...
गटविकास अधिकारी चोपडा यांना दिले निवेदन
मनमानी कारभाराची वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नाही म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य व वर्डी ग्रामस्थांन कडून करण्यात येणार उपोषण
वर्डी ता.चोपडा येथील ग्रामविस्तार अधिकारी ३ महिन्या पासून गावात येत नाही सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर प्रोसेडिंग लिहित असतात तसेच गावाच्या पाण्याच्या टाकीत भरपूर दिवसा पासून मृत कबुतरांचे अवशेष व पिसे पिण्याच्या पाण्यात अडकून येत आहे त्या मुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर ग्रामविस्तार अधिकारी चुकीच्या कामांची बिले काढण्यात मग्न आहे ग्रामपंचायत सदस्य बोलण्यास गेले असता त्यांना ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे तर गटविकास अधिकारी चोपडा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपणास लेखी व तोंडी निवेदने देवूनही आपल्या कडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसुन एक प्रकारे त्यांना अभय दिले जात आहे का असा प्रश्न आम्हाला निर्माण होतो आहे म्हणून आपण सदर बाबतीत गांभिर्याने विचार करून इनकॅमेरा चौकशी करावी अशी मागणी असुन जर संबंधिताची चौकशी केली नाही तर आम्ही खालील सही करणारे सदस्य दिनांक ५/०६/२०२४ रोजी वर्डी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसणार आहोत तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी व जो पर्यंत इनकॅमेरा चौकशी होत नाही तो पर्यंत ग्रा.प.चे काम बंद ठेवण्यात यावे व कुठलेही आर्थिक व्यवहाराचे धनादेश काढण्यात येवू नये सदर चौकशी पूर्ण करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वर्डी ग्रामस्थांनी केली आहे तर दिलेल्या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या करण्यात आले आहेत
No comments