चोपडा येथे महिला दिनाचा कार्यक्रम हरीओम महिलाबहुउद्देशीय संस्था तसेच खांदेश तेली समाज महिला आघाडी याच्या वतीने आज महिला दिनाचे औचीत्य साध...
चोपडा येथे महिला दिनाचा कार्यक्रम
हरीओम महिलाबहुउद्देशीय संस्था तसेच खांदेश तेली समाज महिला आघाडी याच्या वतीने आज महिला दिनाचे औचीत्य साधत चोपडा ग्रामीण च्या पी एस. आय.कावेरी कमलाकर मॅडम यांच्या उपस्थीतीत महिलांचा सत्कार
(संपादक : हेमकांत गायकवाड )
चोपडा :-
येथे श्री.हरीओम महिलाबहुउद्देशीय संस्था तसेच खांदेश तेली समाज महिला आघाडी याच्या वतीने आज महिला दिनाचे औचीत्य साधत चोपडा ग्रामीण च्या पी एस. आय.कावेरी कमलाकर मॅडम यांच्या उपस्थीतीत महिलांचा सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पी.आय.कावेरी प्रभाकर मॅडम यांनी उपस्थीत महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी खांदेश तेली समाज मडळाच्या अध्यक्षा सौ.कविता अनिल चौधरी व उपाध्यक्षा सौ.माधुरी सुधीर चौधरी तसेच चोपडा नगरपरीषदेच्या माजी नगरध्यक्षा आदरणीय मालूताई पाटील ,मा.नगरसेविका दिपाली चौधरी,समाजसेविका सौ.रेखाताई किशोर चौधरी ,श्रीमती.राजसताई चौधरी तसेच महिला पदाधिकारी सौ.शितल चौधरी,सौ.दिव्या चौधरी(लासुर)सौ.योगीता चौधरी सौ.रत्ना चौधरी तसेच इतर महिला बहुसंखेने हजर होत्या.यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची व छोटेखानी नाटक सादर करण्यात आले.यावेळी ह.भ.प.कु.क्रिष्णा चौधरी यांनी महिलांविषयी खुपच छान मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कविता चौधरी यांनी तर आभार ह.भ.प.दिव्या चौधरी (लासुर)यांनी मानलेत.यावेळी महिला मंडळाच्या पदाधिकारी यांना समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रकाश चौधरी ,सुधीर चौधरी,अनील चौधरी,जनार्दन चौधरी यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.

No comments