adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरफोडी - चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला साथीदारासह सुरत येथून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

  घरफोडी - चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला साथीदारासह सुरत येथून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश सुरत (गुजरात) येथुन आरोपींना अटक  (स...

 घरफोडी - चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्याला साथीदारासह सुरत येथून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

सुरत (गुजरात) येथुन आरोपींना अटक 





(संपादक: हेमकांत गायकवाड)

मा‌. पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जळगाव जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हे उघडकिस आणने बाबत पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या दि. 6/ 3/ 2024 रोजी अक्षय संजय कोळी वय 21 रा. इंदिरानगर प्लॉट भाग अडावद ता.चोपडा जिल्हा जळगाव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याने त्याच्या साथीदारासह सावदा व चोपडा येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते त्याबाबत( 01) सावदा पो स्टे गु र नं 37/ 2024 भादवी कलम 461 प्रमाणे( 02) चोपडा शहर पो स्टे गु र नं 613 / 2024 भा द वी कलम 380, 361 प्रमाणे गुन्हे उघडकीस आले होते सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी 1) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा.हातेड बु. ता.चोपडा जिल्हा जळगाव व त्याचा साथीदार 2) सचिन उर्फ भैया रामदास देवरे वय 31 रा. सर्वोत्तम हॉटेल ,हलदरू रोड हरेकृष्ण सोसायटी प्लॉट नंबर 201 कडोदरा सुरत (गुजरात) अशांची नावे निष्पन्न करण्यात आले होते

 सदरचे आरोपी सुरत येथे असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त अंमलदार पो हे को / संदीप रमेश पाटील ,प्रवीण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचंद्र बागुल, गोरखनाथ रामभाऊ बागुल ,चालक महेश सोमवंशी अशा पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सुरत गुजरात येथे पाठवले होते 

त्याप्रमाणे वरील पथकाने सुरत येथे जावून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी 1) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा‌हातेड बु

 ता. चोपडा जि. जळगाव व त्याचा साथीदार 2) सचिन उर्फ भैया रामदास देवरे वय31 रा. सर्वोत्तम हॉटेल हलदरू रोड ,

हरेकृष्णा सोसायटी प्लॉट नंबर 201 कडोदरा सुरत (गुजरात) यांना सुरत शहरातून ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुढील तपास कामी सावदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे

No comments