adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

चोपडा येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह  पाटीलगढीत तसेच तपस्वी मारुती मंदिराजवळील रत्नावती नदीच्या पात्रात पुलाखाली चोपडा शहरात तसेच पाटीलगढी ...

चोपडा येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह 

पाटीलगढीत तसेच तपस्वी मारुती मंदिराजवळील रत्नावती नदीच्या पात्रात पुलाखाली चोपडा शहरात तसेच पाटीलगढी भागात कचरा वेचणारा तसेच भीक मागुन आपला उदरनिर्वाह चालवणारा एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील त्यास दारुचे व्यसन असुन तो त्या व्यसनामुळे मयत अवस्थेत मिळुन आला 



प्रतिनिधी चोपडा

( संपादक : हेमकांत गायकवाड )


चोपडा शहरातील पाटीलगढीतील तपस्वी मारुती मंदिराजवळील रत्नावती नदीच्या पात्रात पुलाखाली चोपडा शहरात तसेच पाटीलगढी भागात कचरा वेचणारा तसेच भीक मागुन खाणारा एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 35 ते 40 वयोगटातील असुन प्राथमिक अंदाजानुसार तो दारुचे व्यसन करीत असुन तो त्या व्यसनामुळे मयत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे




अधिक माहिती अशी की चोपडा शहरातील रहिवासी विजय आत्माराम महाजन रा‌. पाटीलगढी , तपस्वी मारुती मंदिराजवळ चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार दि .२५/०२/२०२४ रोजी सायं.०६:१५ वा च्या पुर्वी पाटीलगढीत तपस्वी मारुती मंदिराजवळ रत्नावती नदीच्या पात्रात पुलाखाली चोपडा शहरात व पाटीलगढी भागात कचरा वेचून व भिक मागुन आपला उदरनिर्वाह चालवत असणारा एक अनोळखी इसम ज्याचे अंदाजित वय ३५/ ४० वयोगटातील असुन त्यास अंदाजानुसार त्यास मद्यप्राशन (दारू पिण्याचे ) व्यसन असुन तो त्या व्यसनामुळे मयत अवस्थेत आढळून आला वरील माहिती नुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रजि.नं. ०४/२०२४ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे

तर मृतावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी इसमाचे वर्णन

सदरील इसम हा अंदाजानुसार ३५ते ४० वयोगटातील असुन शरीराने सडपातळ आहे तर डोक्यावरील केस काळे आहेत दाढी वाढलेली असुन केस काळे आहेत अंगात मळकट पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळ्या व करड्या रंगाचे थंडीचे जॅकेट व कमरेला करड्या रंगाची पॅन्ट असलेला तर उजव्या हाताच्या कामेवर अनिल बुरगीया असे गोंधलेले तसेच अंगावर कुठेही संशयीत निशाण्या दिसुन येत नाही.


या प्रमाणे वरील वर्णनाच्या एक अनोळखी मयत इसम त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील

असल्याने त्याच्या वारसांचा तसेच नातेवाईकांचा व त्याचे नाव गाव याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अधिक तपास करिता चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक योगेश्वर हिरे करीत आहेत


No comments