adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाजारात खाजगी व्यापारी मनमानी करून कमी भावाने ज्वारीची खरेदी करत आहेत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला

  जिल्ह्यातील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करा शेतकरी संघटनेची मागणी बाजारात खाजगी व्यापारी मनमानी करून कमी भावाने ज्वारीची खरेदी करत आहेत या...

 जिल्ह्यातील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करा

शेतकरी संघटनेची मागणी

बाजारात खाजगी व्यापारी मनमानी करून कमी भावाने ज्वारीची खरेदी करत आहेत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला धीर देण्यासाठी जिल्ह्यात भरड धान्य खरेदी केंद्र लवकर सुरू करावेत 

निवेदन सादर करताना शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

यावर्षी खरीप हंगामात भरड धान्य खरेदी केंद्र बंद होती म्हणून ज्वारी खुल्या बाजारात हमीभावापेक्षाही कमी भावाने विकली गेली होती तसेच रब्बी हंगामात ज्वारी व हरभऱ्याची लागवड भरपूर प्रमाणात झालेली आहे बाजारात खाजगी व्यापारी मनमानी करून कमी भावाने ज्वारीची खरेदी करत आहेत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला धीर देण्यासाठी जिल्ह्यात भरड धान्य खरेदी केंद्र लवकर सुरू करावेत अशी मागणी शेतकरी संघटने चे नेते संदीप पाटील यांनी केली आहे.

सरकार म्हणतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत मात्र खरेदी केंद्र न सुरू करता शेतकऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यासाठी बाजार समिती स्थापन केलेले आहेत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल येतो त्याचवेळी त्या धान्याची खरेदी व्हायला हवी मात्र सरकार कडून मार्च महिन्यात नोंदणी करून घेतली जाते मात्र धान्य खरेदी जून महिन्यात केली जातं त्यामुळे कुठल्याही शेतकरी एवढा दिवस घरात धान्य ठेवू शकत नाही सरकारने उपाय योजना अशी करावी की जेणेकरून जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात धान्य येतं तेव्हाच खरेदी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

रब्बी हंगामातील ज्वारी व हरभराचे पिक शेतातून निघायला सुरूवात झाली आहे ज्वारी चा हमीभाव 2930 असुन ही खुल्या बाजारात ज्वारी 2000 रुपये क्विंटल प्रमाणे विक्री होत आहे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे 930 रुपयांचा फटका बसत आहे हा भाव फरक चा तोटा भरून काढण्यासाठी शासनाने लवकरात लवकर भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात याव अशी मागणी चे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांना शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिलं आहे यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी किरण गुजर विनोद धनगर व अल्ताफ तडवी हजर होते.

No comments