adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उनपदेव : नैसर्गिक पर्यटन सहल संपन्न

  उनपदेव : नैसर्गिक पर्यटन सहल संपन्न  महाजन इंग्लिश क्लासेस ने एक अनोख्या उपक्रमातून मुलांना आनंद व पौराणीक माहीतीचा मुलांना योग जमवून आला....

 उनपदेव : नैसर्गिक पर्यटन सहल संपन्न 

महाजन इंग्लिश क्लासेस ने एक अनोख्या उपक्रमातून मुलांना आनंद व पौराणीक माहीतीचा मुलांना योग जमवून आला. निमित्त होते 'उनपदेव' नैसर्गिक पर्यटन सहल 




प्रतिनिधी चोपडा

(संपादक हेमकांत गायकवाड)

चोपडा : -

येथिल महाजन इंग्लिश क्लासेस ने एक अनोख्या उपक्रमातून मुलांना आनंद व पौराणीक माहीतीचा मुलांना योग जमवून आला. निमित्त होते 'उनपदेव' नैसर्गिक पर्यटन सहल म्हणून. शैक्षणिक सहल म्हटली म्हणजे मुलांना आनंद असतो परंतु त्यामधून माहीती काढणे, ज्ञानात भर टाकणे हे महत्वाचे असते. ज्या प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 'उनपदेव' भूमीत आमच्या क्लासेसच्या सहलीचे आयोजन केल. मुलांना तेथील परिसराचे पौराणीक महत्व शरभंग ऋषीचे मंदिर, रामाच्या बाणाने गोमुखातून निघालेले पाणी.. शंकराचे मंदिर, श्रीदत्त मंदिर यांची सर्व त्रेता युगातील माहीती देण्यात आली. प्रभू रामांच्या वनवासातील तेथील वास्तव्याचे महत्त्व सागंण्यात  आले.




 सल्फरयुक्त गरम पाणि याचे त्वचारोग यासाठी माहीती जाणून घेतली - परंतु सहलीचा उद्देश येथे न थांबता मुलांनी वनभोजनाचा देखील अस्वाद घेतला त्यामुळे मुलानी तेथे मुरमू-याची भेड' देखील बनविली. यामधुन त्यांना पाककला देखील शिकायला मिळाली. घरून आणलेले जेवणाचे डबे व भेड याचा मुलांनी यथेच्छ आनंद घेतला. निसर्गाच्या सानिध्यात जेवणाता आनंद काही वेगळाच असतो'.उनपदेव' वन्यजीव सृष्टी व संपदेने भरलेला आहे. त्यामुळे तेथील झाडे, झुडपे  यांची ओळख करून देण्यात आली. भूतकाळात आढळणारे वन्यप्राणि यांची माहिती स्थानिक पावरा वस्तीतील लोकांकडून घेण्यात आली.या  पर्यटन स्थळी अनेक सहली येत असतान जेवणाचा आनंद घेतात परंतु त्याठिकाणी प्लास्टीक पिशव्या कैरी बॅग या तेथेच फेकतात. 'निसर्ग माझा गुरु तोच कल्पतरू' यामुळे निसर्गाच सौंदर्य खराब होते म्हणून मुलांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले.सहलीच्या शेवटच्या टप्प्यात मुलांना मनोरंजनात्मक. खेळ म्हणून गोणपाट शर्यत लिंबूचमचा शर्यत, कबड्डी,  गाणं नृत्य असे खेळ खेळण्यात आले. निसर्गाला जवळ करण्याचा हा दिवस होता म्हणून सर्वांनी निसर्गात्रा आदर, कराना असे भी - दिपक महाजन सरांनी सुचवले 




No comments