सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन दिनांक 18 मार्च 2024 रोजी दुपारी 12 00 ते 2 .00 दरम्यान निर्मल इंटरनॅशनल स्...
सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन
दिनांक 18 मार्च 2024 रोजी दुपारी 12 00 ते 2 .00 दरम्यान निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात आलेले होते
मुक्ताईनगर प्रतिनिधी :-सतीश गायकवाड
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आज दिनांक 18 मार्च 2024 रोजी दुपारी 12 00 ते 2 .00 दरम्यान निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात आलेले होते .आयोजन करण्यामागचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या अनुभव घेण्यासाठी, मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात व ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे आहे त्या सर्वांनी महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहून इंटरव्यू दिला .कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ .अनिता वानखेडे मॅडम होत्या . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील प्राचार्य गणेश राजपूत सर तसेच समन्वयक स्नेहल विजय पाटील मॅम आणि भूषण वाघ, मयूर पाटील, तुषार पाटील हे शिक्षक उपस्थित होते .सदर मुलाखतीसाठी एकूण ११ विद्यार्थी शिक्षशिक्षकांनी मुलाखत दिली त्यापैकी तीन विद्यार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ .जयश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . प्रतिभा पाटील,प्राध्यापक सुवर्णा अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी पंकज वाघ यांचे सहकार्य लाभले .तसेच कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ .नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल डॉ . अनिता वानखेडे मॅडम यांनी त्यांचे ही आभार मानले .

No comments