adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोटरी क्लब चोपडा व श्री गणेशा नेत्रालया तर्फे रा.प.चोपडा आगरा साठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न !

  रोटरी क्लब चोपडा व श्री गणेशा नेत्रालया तर्फे रा.प.चोपडा आगरा साठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न ! शिबीर उद्घाटन चोपडा आगार प्रमुख महेंद्र...

 रोटरी क्लब चोपडा व श्री गणेशा नेत्रालया तर्फे रा.प.चोपडा आगरा साठी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न !

शिबीर उद्घाटन चोपडा आगार प्रमुख महेंद्र लोटन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



चोपडा ।प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

राज्य परिवहन चोपडा आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांसाठी नुकतेच रोटरी क्लब चोपडा व श्री गणेशा नेत्रालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले.

शिबीर उद्घाटन चोपडा आगार प्रमुख महेंद्र लोटन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आगारातर्फे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी रोटे . डॉ .सचिन कोल्हे, रोटरी प्रेसिडेट चेतन टाटीया, सचिव रोटे अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे चंद्रशेखर साखरे यांचे "कर्मचारी हिताचा आरोग्य प्रकल्प" घेतल्या निमित्त कृतज्ञस्वागत करण्यात आले.यावेळी रोटरीचे ज्येष्ठ सदस्य रोटे .एम . डब्ल्यू .पाटील यांनी रोटरी क्लब तर्फे वेळोवेळी अशा जनहितोपयोगी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते अशी सोदाहरण माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले .

वरोल्लेखित रोटरी पदाधिकाऱ्या सह माजी सहप्रांतपाल रोटे .अभियंता विलास पाटील, रोटे .नितीन अहिरराव, कोषाध्यक्ष रोटे सीए पवन गुजराथी व अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते. रा . प .चोपडा आगारातील सुमारे १५० कर्मचारी व कुटुंबिय यांची मोफत डोळे तपासणी व सवलतीच्या दरात चष्मे असा उपक्रम राबविण्यात आला.

No comments