समाजात जुन्या प्रथांना विसरपाडत नव्या प्रथा समाजाला होतायत मारक अध्यक्ष- सोमनाथभाऊ मराठे सुर्यवंशी क्षत्रिय सकल मराठा समाजाचे अध्य...
समाजात जुन्या प्रथांना विसरपाडत नव्या प्रथा समाजाला होतायत मारक
अध्यक्ष- सोमनाथभाऊ मराठे
सुर्यवंशी क्षत्रिय सकल मराठा समाजाचे अध्यक्ष - श्री सोमनाथभाऊ मराठे यांनी वधू-वरांना आशिर्वाद देतांना थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतांना कडवट पण सत्य परिस्थिती मांडली.
जळगाव प्रतिनिधी --
( संपादक : हेमकांत गायकवाड )
*वराड ता. धरणगाव येथील समाजसेवक कै. शिवनारायण देवराम पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव श्री शांताराम (नाना) शिवनारायण पाटील यांच्या मुलांच्या शुभ विवाह निमित्त...*
*सुर्यवंशी क्षत्रिय सकल मराठा समाजाचे अध्यक्ष - श्री सोमनाथभाऊ मराठे यांनी वधू-वरांना आशिर्वाद देतांना थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतांना कडवट पण सत्य परिस्थिती मांडली.*
विवाह सोहळ्यानिमित्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजन, आरती करून सर्व मान्यवरां चा सत्कार सन्मान उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला
विवाह सोहळ्यास उपस्थित जेष्ठ वरिष्ठ आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष व सर्व संचालक मंडळ सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व माननीय पदाधिकारी व सर्व समाज बांधव मित्रपरिवार यांची उपस्थिती होती.
समाजाच्या प्रथा व संथगतीने समाज बिघडवणारी प्रथा समाजाला मारक ठरत आहे. हि मारक प्रथा म्हणजे साखरपुडयात सिंगारपेटी ऐवजी मोबाईल घेवून देण्या सारख्या (वांरवार मुलीच्या बाबतीत घडणा-या कलंकीत घटना ) इत्यादी प्रथा घुसखोरी करीत समाज मनात घर करीत आहेत.
हि प्रथा जोपर्यंत आपल्या घरापर्यंत इज्जतीचे धडेगिनवत येत नाही तो पर्यंत उशीर झालेला असेल. या वरील विषया बदद्ल सांगितलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे मत असेच असते "आपले काय जाते; हा शब्द सर्वाच्या तोंडात असतो. एक दुस-याचे वाइट होईल याची वाट बघण्या पेक्षा समोरच्याला सावध करा. सध्याच्या परिस्थितीत आज नाही तरी उद्याला समाजात घडणा-या गोष्टींचा सामना घरापर्यंत आला तर आपल्याला पण या प्रसगांचा सामना करावा लागू शकतो .
आपण लग्नात वधू वरास आशीर्वाद देतांना.... समाज प्रबोधन करतांना वस्तूस्थिती मांडली याबद्दल फार छान वाटले. सर्वाच्या मनातले बोललात असे वाटते परंतू ..
समाजाच्या पारंपारिक जुन्या प्रथा मोडण्या पेक्षा नव्याने घरात घुसखोरी करीत असलेल्या नव्या प्रथा रूजवल्या जात आहेत. तरी त्याना वेळीच लगाम घाला नाहीतर लवकर म्हणा किंवा कासवगतीने म्हणा समाजाची इभ्रत वेशीला टांगली जाईल व टांगली जात आहे व अजून जावू शकते.
तुम्ही पोटतिडकीने मांडलेली व्यथा समाजाने देखील मनावर घ्यायला हवी.. तुम्ही या विषयांवर बोलत चला ! प्रेमाने बोला नाही तरी काही वेळेला रागाने देखील बोला. परंतू अशा विषयाला लावून धरा बदल होइल .. आज नाही तरी उद्या या गोष्टी पटतील . नाहीतर या बाबत कुणीच नाही बोलले तर अनेकांना समाज संकटातून जावे लागेल.
या बदद्ल अध्यक्ष श्री सोमनाथभाऊ मराठे यांचे मनापासून आभार व धन्यवाद !!
श्री रवींद्र या. पाटील. वडती🙏🏻🙏🏻

No comments