अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लो...
अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका करण्यात आले वितरण
किरण पाटील प्रतिनिधी मुक्ताईनगर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा मजबूत करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 19 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. दिनांक 19 मार्च 2024 रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचार मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2023- 24 अंतर्गत मंजूर अनुदानातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रमाणकानुसार रुग्णवाहिका देण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते लोकार्पण झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका वितरित करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील 19 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचा वापर रुग्णांना आणणे व नेणे यासाठी व गरोदर महिलांसाठी होणार आहे. रुग्णवाहिका वितरित केल्यानंतर अंतुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर संदीप तायडे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची गैरसोय थांबेल .याप्रसंगी अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप तायडे, डॉक्टर प्रियदर्शी तायडे ,दीपक दुट्टे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते
No comments