जाहीर नोटीस तमाम लोकांना, वित्तीय संस्थांना, सहकारी पतपेढ्या, बँका, शासकीय निमशासकीय संस्था विशेष करुन हिराबाई देवाजी पाटी...
जाहीर नोटीस
तमाम लोकांना, वित्तीय संस्थांना, सहकारी पतपेढ्या, बँका, शासकीय निमशासकीय संस्था विशेष करुन हिराबाई देवाजी पाटील, राजेंद्र देवाजी पाटील, रविंद्र देवाजी पाटील, रा. खंडेराव नगर, ममुराबाद, ता.जि. जळगाव व सुनिल पंजाबराव पाटील, रा. वाकडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांना व त्यांचे कायदेशीर वारसदार व हितसंबंधितांना सदरच्या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते ते खालील प्रमाणे.
तुकडी जिल्हा व जि.प. जळगाव, पो.तु.तालुका व पं.स. जळगाव, मौजे ममुराबाद ग्राम पंचायतील हद्दीतील शेत गट नं. ३७०, याचे क्षेत्र १ हे. २५ आर, यास आकार रु. १३.२५ पैसे.
या शेतमिळकतीपैकी आमचे हिश्याचे० हे. ६२.५० आर, आकार रु. ६.६२ पैसे, यांसी चतुःसिमा पुर्वेस कोकीळाबाई सुरेश पाटील, पश्चिमेस मनोहर नामदेव सावळे, उत्तरेस आत्माराम तुमाराम शिंदे यांचे क्षेत्र, दक्षिणेस मधुकर तुकाराम सावळे व संध्या पाटील यांचे क्षेत्र.
येणेप्रमाणे चतुःसिमेचे आतील दगड, माती, जमिन व तदंगभुत वस्तू सह वर नमूद केलेली शेत मिळकत ही हिराबाई देवाजी पाटील, राजेंद्र देवाजी पाटील, रविंद्र देवाजी पाटील व सुनिल पंजाबराव पाटील यांच्या सामाईक मालकीची, वहिवाटीची व प्रत्यक्ष ताब्यातील व कब्जे उपभोगातील आहे. आमचे अशिलास त्यांचेकडुन पूर्ण मालकी हक्काने सदरची शेत मिळकत विकत द्यावयाची आहे. त्यानुसार त्यांनी सौदा केलेला आहे. सदरची मिळकत ही निर्वेध व बोजे विरहित आहे असा विश्वास व भरवसा दिलेला असून आमचे अशिलास सदरची शेत मिळकत घ्यावयाची आहे.
तरी सर्वांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सदर शेत मिळकतीसंबंधी कोणाचाही काहीही हक्क, हितसंबंध, बोजा, तारण, गहाण, जप्ती, जामिनकी, कर्ज प्रकरण, वाटणी, मृत्यूपत्र, वारसा हक्कसंबंध, जागेच्या दिशा व सिमा, क्षेत्र वगैरे बाबत कुठलाही हक्क, दावा, अधिकार वगैरे असल्यास खाली सही करणार यांच्याकडे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत समक्ष भेटून कागदपत्रे दाखवून त्यांचे समाधान करावे, तसे न केल्यास कोणाचा असलेला हक्क त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे व सदरची मिळकत निर्वेध, बोजेविरहित व क्लिअर मार्केटेबल टायटलची आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. मग तद्नंतर सदर मिळकतींबाबत कोणाचीही कोणतीही तक्रार आमचे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही, ही जाहीर नोटीस दिली असे.
सदरची नोटीस पक्षकाराने दिलेल्या कागदपत्र व खात्री दिल्यावरुन, माहितीवरुन आमचे मार्फत दिली आहे.
जळगाव
दिनांक २२/०३/२०२४
सही/-
ॲड. शैलेंद्र बी. पाटील
शिक्का ४६, ॲडव्होकेट चेंबर्स, शाहुनगर, जळगाव मो.नं. ९८२३५४८३१६
No comments