adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अकुलखेडा येथे मतदार जनजागृती अभियान

  पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अकुलखेडा येथे  मतदार जनजागृती अभियान  मतदान जनजागृती अभियान अंतर्गत शाळांचे विद्यार्थी व...

 पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अकुलखेडा येथे  मतदार जनजागृती अभियान 

मतदान जनजागृती अभियान अंतर्गत शाळांचे विद्यार्थी व शिक्षक आणि मान्यवर ने शपथ घेतली



प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा :- 

तालुक्यातील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक  विद्यालय अकुलखेडा येथे मतदार जनजागृती अभियान अंतर्गत शाळेतील विद्यार्थी , शिक्षक व मान्यवरांनी  शपथ घेतली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. सदरील कार्यक्रमातून शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची व जनजागृती करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचे प्रक्रियेत मतदान करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. मतदान करून तुम्ही बदल घडवू शकता आणि तुमच्या समाजात बदल घडवू शकता. तसेच मतदान विषयी विद्यार्थींशीं संवाद साधून मतदानाचे महत्व पटवून सांगितले मतदार जागृती करण्यासाठी  प्रतिपादन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले.

No comments