आशा दिनी आशा स्वयंसेविकांची मतदार जागृती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चोपडा पंचायत समितीच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुकाभरात...
आशा दिनी आशा स्वयंसेविकांची मतदार जागृती
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चोपडा पंचायत समितीच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुकाभरातील आशा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
चोपडा ( प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा :-
येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चोपडा पंचायत समितीच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुकाभरातील आशा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा दिवस आशा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मनमोहक रांगोळ्या काढून आशा स्वयंसेविकांनी सामाजिक संदेश देत प्रबोधन देखील केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांचा गौरव मान्यवरांनी केला.
तालुकाभरातून उपस्थित सर्व आशा कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती देखील यावेळी करण्यात आली. 04 रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा 10 (अ.ज) विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जळगाव (पुनर्वसन) गजेंद्र पाटोळे, अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ , तालुका आरोग्य अधिकारी इत्यादी आशा स्वयंसेविकांना मतदान करण्यासाठी जागृत केले. तसेच कोणीही आदर्श आचारसाहिंतेच्या भंग होणार नाही यांची खबरदारी घेतली पाहिजे. तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी त्यांनी आपापल्या गावात जाऊन जनजागृती करावी असे आवाहन मान्यवरांनी केले.
उत्कृष्ट जनजागृती कार्यक्रम करणाऱ्या पाच आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिले.
No comments