चोपडा तालुका मोटर मालक कामगार संघटनेचा कामगार मेळावा मोठ्या उत्साहने व संपन्न. मोटर मालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका शाखे...
चोपडा तालुका मोटर मालक कामगार संघटनेचा कामगार मेळावा मोठ्या उत्साहने व संपन्न.
मोटर मालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका शाखेची रचना व पदग्रहण मेळावा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
आज दि.६ मार्च २०२३ बुधवार रोजी मोटर मालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका शाखेची रचना व पदग्रहण मेळावा डॉ.ऎ.पि.जे अब्दुल कलाम नगर पालिका हॉल चोपडा येथे मोठ्या उत्साहाने व मालक कामगारांच्या मोठ्या संख्याने उपस्थितीत संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी चंद्रहासभाई गुजराथी चेअरमन पिपल्स बैंक चोपडा होते
प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव व प्रमुख उपस्थितीत नाशिक विभाग प्रमुख किशोर भाऊ, शिरपुरचे संतोष भागवत,अरुण वाघ, माजी उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी,मा.उपनराध्यक्ष हुसैन खा पठाण होते मेळाव्यात चोपडा तालुका अध्यक्षपदी भुपेंद्र गुजराथी,उपाध्यक्ष शेख मुख्तार सरदार,सचिव अकील जागीरदार,सह सचिव मक्सुद खान,खजिनदार चंद्रेश भावसार,ऎक्शन कमेटी अध्यक्ष संजय गुजराथी,सहअध्यक्ष अहसान अली,संपर्क प्रमुख जाकीर सलिम शेख,कार्यकारीणी सदस्य शरीफ बेग,ईंद्रश जैन,शेख हमीद,जहुर अली सैय्यद यांची निवड करण्यात आली सुत्रसंचालन नौमान काजी यांनी केले, आभार प्रदर्शन अकील जागीरदार यांनी केले, मेळावा यशस्विकरीता प्रयत्न जमील कुरैशी चाहत जागीरदार,व ईतर सहकार्यांनी केले.
No comments