कंट्राकदार बेजाबाबदार व मनमानी पद्धतीने कामकाज करीत असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे सदर कंट्रोल व कायदेशीर कारवाई करावी क***** यादी ट...
कंट्राकदार बेजाबाबदार व मनमानी पद्धतीने कामकाज करीत असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे सदर कंट्रोल व कायदेशीर कारवाई करावी क***** यादी टाकण्यात यावे
जळगाव शहरातील प्रकल्प संचालक श्री शिवाजी पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली असता समर्पक उत्तरे मिळाली नाही
प्रतिनिधी जळगाव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धुळे कडून जळगाव शहरात प्रवेश करताना खोटे नगर पासून ते कालिका मंदिरापर्यंत रोडचे काम उड्डाणप्राचे डिव्हाईडर रिफ्लेक्टर झाडे लावणे व त्याचे संगोपन करणे तसेच चौक व इतर बाबींचे बांधकाम देखभाल दुरुस्तीचे कामकाजाचे कंत्राट कंत्राटदारश्री मोहित जन्डू परियोजना निर्देशक जन्डू कंट्रक्शन कंपनी 305 मॉडल टाऊन मंडी आदमपूर जिल्हा हिसार हरियाणा यांचा व शासनाच्या वतीने श्री नरेश वडेटवार महाप्रबंधक (तांत्रिक )भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पहिला मजला नारंग टावर्स सिव्हिल लाईन नागपूर 440001 यांच्या त दिनांक 11/7 /2019 रोजी करार झालेला आहे सदर ठिकाणी रोड रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे बनवण्यात आले आहेत दोन्ही रोडांच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या डिव्हाईडर त्यात रोपवण्यात आलेले रिफ्लेक्टर तुटल्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेले नाहीत त्यामुळे रोड कुठे संपला आणि कुठे सुरू झाला याबाबत बोध होत नाही डिव्हाईडरच्या मध्यवर्ती ठिकाणी झाडे लावण्यात आलेले नाहीत रोडच्या तसेच उड्डाण पुलाच्या आजूबाजूला होणारे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही उड्डाण पुलावरील बॅरिगेड तुटलेल्या व भंगार अवस्थेत पडून आहेत नियमित पणे देखभाल दुरुस्ती डागडूजी नियमानुसार होताना दिसत नाही संबंधित कंपनीच्या करारात या सर्व बाबी देखभाल दुरुस्ती बाबत नमूद व बंधनकारक असून या संबंधित कंपनी सदर कामकाजा दुर्लक्ष करीत आहे जळगाव शहरातील नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे तसेच प्रसंगी प्राणही गमवा लागत आहे याबाबत जळगाव शहरातील प्रकल्प संचालक श्री शिवाजी पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली असता समर्पक उत्तरे मिळाली नाही नंतर संदर्भ 01 नुसार माहिती अधिकार अर्ज करून माहिती मागवली असता धक्कादायक माहिती संबंधित विभागाकडून समोर आली ही माहिती संबंधित जन्डू कंट्रक्शन कंपनीने देखभाल दुरुस्तीसाठी या ठिकाणी नियुक्त केलेल्या कुशल /अकुशल कामगारांची माहिती मागितली असता अशी कोणतीच माहिती या कार्यालयात उपलब्ध नसल्याने पत्र मिळाले तर म्हणजेच सदर कंपनीचे या ठिकाणी कुठलेही कर्मचारी नियुक्ती केले नाहीत म्हणजेच करारानुसार अटी व शर्तीचा भंग केल्याचे दिसून येत आहे सदर ठिकाणी कंट्राकदार बेजाबाबदार व मनमानी पद्धतीने कामकाज करीत असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे सदर कंट्रोल व कायदेशीर कारवाई करावी क***** यादी टाकण्यात यावे या तक्रार द्वारे आपणास विनंती करीत आहे की आपण सदर तक्रार प्राप्त झाल्यापासून सहा दिवसाच्या आत आपण कराचे अटी व शर्ती ची पुर्तता न केल्यास किंवा काम चालू न केल्यास रोडावरील होणारे ठिय्या आंदोलन तसेच न्यायालयीन बाब निर्माण झाल्यास आपण त्या सर्वच जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी अशी माहिती तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिली
No comments