adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाने मतदान जनजागृती अभियानाच्या विविध उपक्रमास सुरुवात

  सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाने मतदान जनजागृती अभियानाच्या विविध उपक्रमास सुरुवात  मी मतदान करणारच' या आशयाचा मतदान जनजागृती अभियानांतर्गत...

 सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाने मतदान जनजागृती अभियानाच्या विविध उपक्रमास सुरुवात 



मी मतदान करणारच' या आशयाचा मतदान जनजागृती अभियानांतर्गत सुंदर सेल्फी पॉईंट बनवला आहे

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील निवडणूक निर्णायक अधिकारी -रावेर मतदार संघ यांच्यामार्फत निवडणूक जनजागृती अभियान सध्या सर्वत्र राबवले जात आहे.त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, चोपडा तालुक्याचे सहाय्य्क निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात,निवडणूक नायब तहसीलदार सचिन बाबळे,गटशिक्षणाधिकारी तथा स्विप चे नोडलं अधिकारी अविनाश पाटील,नोडल अधिकारी युवराज पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने चोपड्यात विविध मतदान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.त्यातील एक भाग म्हणजे विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांना दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी घरगुती वस्तूंचा उपयोग करत 'मी मतदान करणारच' या आशयाचा मतदान जनजागृती अभियानांतर्गत सुंदर सेल्फी पॉईंट बनवला आहे.त्यात अनेक अधिकारी वर्ग ,शिक्षक वृंद,विद्यार्थी यांनी आपले फोटो काढत मतदान करणे आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजून घेतले.या उपक्रमासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक नरेंद्र भावे,पवन लाठी यांचे विसपुते यांना सहकार्य लाभले.सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्य्क निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बाबळे,गटशिक्षणाधिकारी तथा स्विपचे नोडलं अधिकारी अविनाश पाटील,नोडल अधिकारी युवराज पाटील,विवेकानंद संस्थेचे सचिव ऍड.रवींद्र जैन,संस्थेचे विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. मतदानासाठी मतदारांना प्रेरित करण्यासाठी नवनवीन उपक्रम इतरांनीही राबवत मतदार जनजागृती करावी असे आवाहन यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केले.

No comments