adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 04 रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत 10- चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक...

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


04 रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत 10- चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी निवडणूक प्रशिक्षण यांची दिनांक 20 मार्च 2024 रोजी नगरपालिकेचे समिती सभागृह चोपडा येथे बैठक संपन्न झाली  



प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

        लोकसभा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन मा.गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली 04 रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत 10- चोपडा (अ.ज.) मतदारसंघ मधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी निवडणूक प्रशिक्षण यांची दिनांक 20 मार्च 2024 रोजी नगरपालिकेचे समिती सभागृह चोपडा येथे बैठक संपन्न झाली . 



              मा.तहसीदार श्री भाऊसाहेब थोरात यांनी निवडणूक प्रशिक्षण सविस्तर माहिती पीपीटी च्या साहय्याने सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी निवडणूक प्रकीयेविषयी सविस्तरपणे दिली. अधिकारी /कर्मचारी यांना ओळखपत्र देणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारमध्ये जाणीव वा जागृती करणे निवडणुकीमध्ये निर्बंध कुठे लागू आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक खाजगी जागेच्या उपयोग करवयाचे असल्यास संबंधित मालकाने प्रशासन पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. संवेदशील भागात 50 % मतदान केंद्राचे वेब कास्टिंग प्रयत्न करण्यात येणार आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. शांततेचा भंग केल्यास सीआरपीसी 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल सेक्टर अधिकारी / निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांच्या जबाबदारींचे अवलोकन करण्यात आले निवडणुकी संदर्भातील साहित्य वाटपाच्या यादीचे वाचन करण्यात आले

            सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 04 रावेर लोकसभा मतदारसंघ यांनी केलेल्या सूचना निवडणूक कर्तव्यावर गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येईल ईव्हीएम मशीन जोडणी सर्व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावी पहिले प्रशिक्षण पाच किंवा सहा एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्याचा मानस आहे प्रशिक्षणापूर्वी आणि प्रशिक्षणानंतर अधिक माहितीसाठी सर्वांनी माहिती पुस्तिकेचे वाचन करावे.

No comments