adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

योगेश सौभागे यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर

योगेश सौभागे यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित यांच...

योगेश सौभागे यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने दिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ 
 श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष व दैनिक विदर्भ सत्यजित वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक
 मा.यौगेश सौभागे



शिर्डी, प्रतिनिधी 
(संपादक:हेमकांत गायकवाड)

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा मान सन्मान व प्रतिष्ठेचा असा .आंतरराष्ट्रीय पातळीवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ हा नुकताच मेहकर येथील श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष व लोकप्रिय दैनिक विदर्भ सत्यजित वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक मा.यौगेश सौभागे यांना जाहीर करण्यात आला आहे.मा.यौगेश भाऊ सौभागे यांचे समाजाप्रती विशेष मोलाचे भरीव असे योगदान लाभले आहे.समाजातील सामाजिक ,धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा प्रथम अग्रस्थानी असतो .नवपिढीला योगदान प्रोत्साहन मदत समाजातील विविध घटकांना त्यांची खंबीरपणे साथ असते . नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यौगेश सौभागे यांनी समाजात एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून मान मिळवला आहे.श्री बालाजी अर्बन चे ते अध्यक्ष असून लोकप्रिय दैनिक विदर्भ सत्यजीत वृत्तपत्राचे ते कार्यकारी संपादक आहेत.समाजाला त्यांचे भरीव योगदान लाभले आहे एक प्रभावी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.त्यांच्या याचं उल्लेखनीय कार्य कर्तुत्व आणि भरीव कामगिरीची दखल घेवून आंतराराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.सदर पुरस्कार आणि गौरव सोहळा हा शुक्रवार दि.३ मे २०२४ रोजी जागतिक दर्जा असलेल्या श्री साईबाबा पवित्र तिर्थक्षेत्र शिर्डी येथे पार पडणार असून.पुरस्कार गौरव सोहळा हा प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेते मा.श्री.काळुराम ढोबळे सर व देशातील नामांकित म्हणून असलेल्या नागपूर येथील सावी उर्फ सोनी वासनीक मॅडम . तसेच लोणी प्रवरा येथील समाजभूषण मा.श्री.उत्तम काका घोगरे पाटील व औरंगाबाद येथील प्रसिद्ध रोड काँटॅक्टर व चित्रपट निर्माता मा.श्री.सतिष खांडविकर सर यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीचा समाजभूषण २०२४ पुरस्कार मान सन्मानाने यौगेश सौभागे यांना प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार सोहळा निवड पत्र हे पुरस्कार सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री .सुदाम संसारे यांनी यौगेश सौभागे यांना अधीकृत रित्या निमंत्रण म्हणून पुरस्कार स्विकारण्यासाठी दिले आहे . जाहीर झालेल्या पुरस्कार बद्दल सर्व क्षेत्रांतून मा.यौगेश सौभागे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जातं आहे

No comments