भोई समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सोबतच जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी ( स...
भोई समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात सोबतच जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
किरण पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी
( संपादक हेमकांत गायकवाड )
महाराष्ट्रातील भोई समाज व तत्सम पोट जाती समुदायाच्या आरक्षणाच्या विविध बाबी तसेच माजी खासदार स्वर्गीय जतीराम बर्वे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे यासह विविध मागण्याबाबत जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळातर्फे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,तहसीलदार तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. सदर निवेदन तहसीलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठवण्यात आले आहे.
शिष्टमंडळाचे नेतृत्व जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष एस ए भोईसर, मुक्ताईनगर तालुका भोई समाजाचे अध्यक्ष छोटू भोई, काँग्रेस च्या भटक्या जाती जमाती व विमुक्त जमाती सेलचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, भोई समाज प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तत्काळ बैठक घेऊन समाजाचा प्रश्न मार्गी लावणे संदर्भात आश्वासन दिले. तसेच मुक्ताईनगर येथे भोई समाज भवन बांधण्यासाठी निधी देण्याचे देखील आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,भोई व तत्सम पोट जाती समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोटीच्या वर आहे. भोई समाज हा नदी, तलाव, धरणे यांच्या काठावर राहणारा व डांगरवाडी,चणे- फुटाणे व मासेमारी तसेच मासे विक्री करून उपजीविका करणारा मागासवर्गीय समाज आहे. समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छीमारी आहे, मच्छीमारी सहकारी संस्थांच्या सभासदांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावे भोई समाज हा राज्य सरकारमध्ये एनटी ब म्हणजेच भटक्या जमातींच्या यादीत आहे. भोई समाजाच्या एकूण 39 पोट जाती महाराष्ट्रात असून सर्व एनटी ब मध्येच मोडतात तसेच केंद्र सरकारच्या यादीत इतर मागासवर्गीय म्हणून नोंद आहे. प्रामुख्याने समाज हा ग्रामीण भागात राहत असून अगदी हालाखीचे जीवन व्यतीत करत आहे.
*या आहेत मागण्या*
1) भटक्या जमातीच्या माध्यमातून मिळणारे 39 पोट जातींसाठी अडीच (2.5/-) टक्के आरक्षण हे अतिशय तुटपूजा स्वरूपाचे असल्याने त्यात राजकीय आरक्षणाचा समावेश देखील नाही त्यामुळे समाज हा राजकीय व सामाजिक दृष्ट्या मागे पडत चाललेला आहे. पूर्वीप्रमाणेच चार टक्के आरक्षण भोई समाजाला देण्यात यावे.
2)देशाच्या काही राज्यात भोई समाजातील पोट जाती अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, ओरिसा, कर्नाटक असे राज्य समाविष्ट आहेत. देश पातळीवर अनुसूचित जाती जमातीत असणारा भोई समाज मात्र महाराष्ट्रात भटक्या जमातीमध्ये मोडला जात आहे. त्यामुळे भोई समाजाला अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे
3)केन्द्र सरकारने नेमलेल्या बाळकृष्ण रेणके आयोग व दादा इदाते आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत ठराव मंजूर करुन केंद्र सरकार कडे अंमलबजावणीसाठी करण्यात यावी
4) खासदार जतिरामजी बर्वे आर्थिक विकास महामंडळ या नावाने भोई समाजासाठी महामंडळाची स्थापना करून भरीव निधीची तरतूद करण्यात यावी,
5)भोई समाजातील मुला मुलींना उन्नत प्रगत गटाची अट रद्द करण्यात यावी
6) यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मार्फत घरकुल मिळावे व घरकुलाचे अनुदान 120000 ऐवजी 250000 एवढे करण्यात यावे ..
अशा मागण्या भोई समाजाच्या वतीने करण्यात आल्या. सदर आशयाचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरचे तहसीलदार व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी नामदेव मिठाराम भोई, भास्कर वानखेडे, सुभाष सूर्यवंशी, सोपान भोई,सिताराम भोई, ज्ञानेश्वर भोई, हिरामण मोतीराम भोई, रघुनाथ काशिनाथ ढोले, मधुकर वानखेडे, मधु भोई,रवींद्र घाटे, सुभाष भोई, रतन भोई, सोपान भोई, हरी भोई, ज्ञानेश्वर भोई, प्रवीण भोई, दिलीप भोई, अनिल भोई, मयूर भोई, संजय वाडीले, प्रवीण इंगळे, बाळासाहेब भोई, जगन्नाथ भोई, प्रा.मनोज भोई या प्रमुख मान्यवरांचा मोठ्या संख्येने भोई समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


No comments