आयडियल इंग्लिश अकॅडमी चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न, इंडियाज गॉट टॅलेंट फेम, रनर अप इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सन मिस योगेश्व...
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:हेमकांत गायकवाड)
काल दिनांक 17 मार्च रोजी शहरातील शरद चंद्रिका नाट्यगृहात आयडियल इंग्लिश अकॅडमी चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंडियाज गॉट टॅलेंट रनर अप, आंतरराष्ट्रीय खेळाडू मिस योगेश्वरी मिस्त्री या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, भाषिक उपक्रम, व्याकरण परीक्षा यांची बक्षीसे व विविध पुरस्कार देण्यात आले. यात प्रामुख्याने इंग्लिश ओलिंपियाड, स्पेलिंग बी, इंटरनॅशनल इंग्लिश ग्रामर, ड्रॉइंग एक्झामिनेशन, GTS, CPL, आयडियल स्टुडन्ट ऑफ द इयर, आयडियल सुपर स्पेलर्स, आयडियल सुपर रीडर्स, आयडियल बेस्ट बुक कीपर्स असे विविध पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अकॅडमी चे संचालक श्री पद्माकर पाटील यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मिस योगेश्वरी मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांना साधारण परिस्थितीतून ग्लोबल लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम व भाषा यांची जोड असणे आवश्यक आहे हे नमूद केले. श्री युवराज सावंत यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व प्रतिपदान केले. कार्यक्रमासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थी व पालकांनी सेलिब्रिटी मिस योगेश्वरी यांच्याकडून ऑटोग्राफ घेणे व त्यांच्यासोबत सेल्फी घेणे यासाठी एकच गर्दी केली. विद्यार्थ्यांना सेलिब्रेटी कडून पारितोषिक स्वीकारताना फार आनंद झाल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. पालक व विद्यार्थ्यांसाठी शेवटी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आलेली होती. सर्व स्वयंसेवक, कमिटी स्टुडंट्स यांनी शिस्तप्रिय पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला व पार पाडला.
अकॅडमी नाविन्यपूर्ण पद्धतीने कौशल्यवान व आधुनिक विद्यार्थी घडवण्यावर जोर देत असते. संचालक श्री पद्माकर पाटील यांचा इंग्रजी विषयाच्या कौशल्यांवर आधारित अध्यापनावर जोर असल्यामुळे अकॅडमी पालकांच्या पसंतीची बनलेली आहे.









No comments