adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात पोलिसांनकडून कुंटणखान्यावर छापेमारी

चोपड्यात पोलिसांनकडून कुंटणखान्यावर  छापेमारी  कुंटनखाना चालवणाऱ्या ११ महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी ५ दलाल, १...

चोपड्यात पोलिसांनकडून कुंटणखान्यावर  छापेमारी 

कुंटनखाना चालवणाऱ्या ११ महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी ५ दलाल, १० मालकीण महिलांसह ५० महिलांना ताब्यात घेतले 



प्रतिनिधी चोपडा

(संपादक: हेमकांत गायकवाड)


चोपडा :-

नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा पोलिसांच्या पथकाने २० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत एकूण ५० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटनखाना चालवणाऱ्या ११ महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

तर अधिक माहिती अशी की 

 चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक ३४ मध्ये अनधिकृत पणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवुन त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याची पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना खबर मिळाली होती. त्यानुसार दिनांक २०/०३/२०२४ रोजी ७:४५ वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला व पंचाना नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक ३४ मध्ये पाठवुन तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याची खात्री करण्यास सांगितले होते. तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असलेबाबत खात्री झाल्याने मा.. उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग चोपडा, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई केली असता एकुण ११ महीला आरोपी हे स्वतःचे फायद्यासाठी त्यांचे ताब्यातील झोपड्यामध्ये एकुण ५० महीलांना अडकवुन त्यांचा देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचेकडून कुटूंणखाना चालवितांना मिळुन आल्या आहेत. त्यांचेवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला CCTNS गु.र.नं.-१११/२०२४ स्त्रिया व मुलीचे अनैतीक व्यापारास प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुनएकुण ५० पिडीत महीलांची सुटका करुन त्यांना आशादिप सुधारगृह जळगांव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी साो, मा. श्रीमती कविता नेरकर साो, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे साो, चोपडा भाग चोपडा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत कंडारे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. एकनाथ भिसे, पोउपनि श्री. अनिल भुसारे, पोउपनि श्री. योगेश्वर हिरे, पोहेको विलेश सोनवणे, पोहेकॉ/ दिपक विसावे, पोहेकॉ/ हरिषचंद्र पवार, पोहेको  शेषराव तोरे, पोहेकॉ/ संतोष पारधी, पोहेकॉ/ ज्ञानेश्वर जवागे, मपोहेकॉ/ विद्या पांडुरंग इंगळे, मपोहेकॉ/ शुभागी पुंडलीक लांडगे, मपोहेकॉ/ रत्नमाला शिरसाठ, पोकॉ/ रविंद्र दिलीप पाटील, पोकॉ/ लव सोनवणे पोकों/ युनुस शहा यांनी केली आहे.


No comments